शेल्ड्रिक वाइल्डलाईफ ट्रस्ट (Sheldrick Wildlife Trust) कडून एक व्हिडीओ एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. यात काही वन अधिकारी एका जखमी हत्तीचा जीव वाचवताना दिसत आहे. एक हत्ती शिकाऱ्यांच्या विषारी बाणाने जखमी झाला होता. वन अधिकाऱ्यांना याची माहिती मिळताच त्यांनी लगेच हालचाल करत हत्तीचा जीव वाचवला.
त्सावो पश्चिममध्ये राऊंड दरम्यान ट्रस्टच्या एका फिक्स्ड-विंग पायलटने जवळपास ४५ वर्षाच्या एका हत्तीला पाहिलं. ज्याचे दात मोठाले आहेत. त्यामुळे त्याच्यावर शिकाऱ्याचं लक्ष होतं. काहीतरी चुकीचं झाल्याचं लक्षात येताच पायलटने हत्तीला चेक केलं तेव्हा त्याला हत्तीच्या पायाजवळ एक जखम दिसली. त्यानंतर टीमने लगेच हालचाल केली.
एका केडब्ल्यूएस पशुचिकित्सकाला विमानाने आणण्यात आलं. ट्रस्टच्या अधिकृत ब्लॉगमध्ये हत्तीवर करण्यात आलेल्या उपचाराची सविस्तर माहिती दिली आहे. डॉ. करियुकी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हत्तीचं मृत मास काढलं आणि जखम स्वच्छ केली. यादरम्यान टीमने हत्तीच्या कानामागे आणि त्याच्या पाठीवर पाणी टाकून त्याला थंड ठेवलं. सोंडेत एक काठीही ठेवण्यात आली होती. एंटीबायोटिक्स आणि इतर काही औषधे दिल्यावर हत्तीला यशस्वीपणे पुनर्जीवित केलं गेलं.
हे अविश्वसनिय बचाव कार्य शेल्ड्रिक वन्यजीव ट्रस्टच्या कामाचं रूपही दाखवतं आणि हेही दर्शवतं की, शिकाऱ्यांविरोधात लढाई सुरू आहे.