Elephant Viral Video : मनुष्य आणि प्राण्याचं नातं फारच सुंदर असतं. दोघांचे सोबतचे अनेक प्रेमळ व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमीच बघायला मिळतात. प्राणी आणि मनुष्यांच्या नात्यांचे अनेक किस्से लोकप्रिय आहेत. यांचे व्हिडीओ लोकांना खूप आवडतात. अनेकदा तर असे नजारे बघायला मिळतात की, भावूक व्हायला होतं. हे व्हिडीओ पाहून असं वाटतं की, या नात्यापेक्षा दुसरं भारी नातं नाही. याचंच उदाहरण दाखवणारा एका व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे.
व्हायरल झालेल्या या व्हिडीओत हत्तींचा एक कळप आहे. ते त्यांच्या केअरटेकरकडे घाईघाईने येताना दिसत आहेत. हा व्हिडीओ सर्वांनाच आकर्षित करत आहे. व्हिडीओत जी व्यक्ती दिसत आहे त्याचं नाव डेरेक थॉम्पसन आहे. डेरेक थॉम्पसन वाहत्या नदीत अनेक हत्तींसोबत मस्ती करताना दिसत आहे. व्हिडीओत बघू शकता की, हत्ती त्यांच्या सोंडेने डेरेकचं शानदार स्वागत करत आहेत.
डेरेक तब्बल १४ महिन्यांनंतर या हत्तींना भेटला होता. रिपोर्टनुसार, हा नजारा थायलॅंडच्या एलीफंट नेचर पार्कमधील आहे. जे कुणी हा व्हिडीओ बघत आहेत ते इमोशनल होत आहे. लोक या व्हिडीओवर लाइक्सचा पाऊस पाडत आहेत तसेच लोक कमेंट्सही करत आहेत. व्हिडीओ पाहून अंदाज लावला जाऊ शकतो की, एक व्यक्ती जणू आपल्या जवळच्या व्यक्तीला अनेक वर्षांनी भेटत आहे.
Buitengebieden नावाच्या ट्विटर हॅंडलवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओवर एका यूजरने कमेंट करत लिहिलं की, खरंच प्राणी आपल्या मित्रांना कधी विसरत नाहीत. एका दुसऱ्या यूजरने लिहिलं की, मनुष्य आणि प्राण्यांची मैत्री खरंच कमाल असते.