जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या 48 लाख 05,554 इतकी झाली आहे. त्यापैकी 18 लाख 60,216 रुग्ण बरे झाले आहेत, परंतु 3 लाख 16,753 लोकांना प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे लॉकडाऊनचा कालावधीही वाढत चालला आहे. अनेकांचं वर्क फ्रॉम होम सुरू आहे, तर हातावर पोट असणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. या लॉकडाऊनमुळे घरातच अडकून रहावे लागलेल्या लहान मुलांचे दुःख काही वेगळेच आहे. एक तर हा कोरोना व्हायरस काय याची त्यांना जाण नाही आणि त्यात हा व्हायरस कधी जाईल, हेही त्यांना समजावून सांगू शकत नाही. मग प्रत्येक पालक आपापल्या मुलांना आनंदी ठेवण्यासाठी आपापल्या परीनं काहीतरी करत आहेत.
सोशल मीडियावर अशाच एका बापाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्याची मुलगी जवळपास चार वर्षांची असेल असं व्हिडीओत पाहून दिसत आहे. क्वारंटाईमुळे कंटाळलेल्या या मुलीच्या चेहऱ्यावर आनंद आणण्यासाठी बापानं लढवलेल्या शक्कलचं सर्वत्र कौतुक होत आहे. या व्हिडीओतील बाप त्याच्या मुलीला रोज कचरा टाकण्यासाठी घराबाहेर घेऊन येत आहे. पण, घराबाहेर येण्यातच एक गंम्मत आहे. रोज ही बाप-लेक विविध सुपर हिरो किंवा कार्टून कॅरेक्टरचा पोषाख घातलेले दिसत आहेत. व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ नक्की कुठला आहे, हे सांगणे अवघड आहे. पण, बापाच्या या प्रेमाचं आणि आयडियाची सर्वत्र चर्चा व कौतुक होत आहे.
पाहा व्हिडीओ...
अन्य महत्त्वाच्या बातम्या
मर्यादा ओलांडू नकोस, अन्यथा तुझी लायकी दाखवून देईन; आफ्रिदीच्या विधानानंतर हरभजन सिंग भडकला
22 कोटींना घेऊन आलास, तरी काश्मीर आमचाच होता अन् राहणार; 'गब्बर'नं आफ्रिदीला खडसावलं
सध्याच्या परिस्थितीत IPL 2020 होणं अवघड, BCCIनं मांडलं परखड मत
भीक मागून जगणाऱ्या तुझ्या देशासाठी काहीतरी कर; सुरेश रैनानं आफ्रिदीला जागा दाखवली