सध्या सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होताना दिसून येत आहेत. लॉकडाऊनमुळे वेगवेगळ्या रस्त्यांवर जंगली प्राणी फिरताना दिसून येत आहेत. कारण लॉकडाऊनमुळे अत्यावश्यक सेवा वगळता रस्त्यावर माणसांची ये-जा पूर्णपणे बंद झाली आहे. त्यामुळे प्राणी मुक्त संचाराचा आनंद घेताना दिसून येत आहेत. असाच एक व्हिडीओ आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. असं दृश्य तुम्ही या आधी कधीही पाहिलं नसेल. हा व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एटीएम मशीनमध्ये साप शिरला आहे.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. गाजियाबादच्या कविनगर गोविंगपुरम भागात एका बँकेच्या एटीएम मशीनमध्ये ७ फूट लांब साप शिरला आहे. लोकांनी एटीएममधून पैसै काढण्यासाठी रांग लावली आहे आणि समोर इतकी माणसं असताना सुद्धा हा साप एटीएम मशीनपर्यंत पोहोचला आहे. एटीएमच्या बाहेर रांगेत उभे असलेल्या लोकांमुळे सापाला आत जायला वाट मिळाली नाही. त्यामुळे साप एटीएम वर चढून आत शिरला आहे. हा व्हिडीओ पाहून एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे कधीही एटीएममध्ये पैसै काढायला जाताना सावधता बाळगायला हवी. (हे पण वाचा-गोव्यात पहिल्यांदाच रूबाबदार 'बगीरा' बिनधास्त फिरताना कॅमेरात कैद, फोटो झाले व्हायरल!)
माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार सापाला एटीएम मशीनच्या आसपास फिरताना पाहून गार्डने दरवाजा बंद केला होता. त्यानंतर एटीएम मशीनमध्ये साप शिरल्याची सुचना वनविभाग अधिकाऱ्यांना दिली. मग वनविभागाच्या टीमने रेस्क्यू ऑपरेशन करून सापाला सुखरूप जंगलात सोडलं. काही दिवसांपूर्वी अशीच घटना तामिळनाडूमध्ये सुद्धा घडली होती. (हे पण वाचा-बापरे! सिंहासोबत सेल्फी घ्यायला गेला; अन् असं काही करून बसला, पहा व्हायरल व्हिडीओ)