आपल्याकडे एखादा अपघात झाला तर मदतीला धावून येणारे लोक फारच क्वचित दिसतात. जास्तीत जास्त लोक हे उगाच आपण कशाला लक्ष द्यायचं म्हणून तिथून कलटी मारतात. तरी काही अशा घटना बघायला मिळतात ज्यात माणूसकी जिवंत असल्याचं बघायला मिळतं. असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
एक महिला कारखाली येते. तेही SUV सारख्या मोठ्या कारखाली. मात्र, लोक हे दिसताच लोक धावत येतात आणि त्या महिलेची मदत करू लागतात. लोकांनी एकत्र येऊन ती कार उचलली आणि महिलेला बाहेर काढलं. ज्या वेगाने आणि पद्धतीने लोक जमा झाले ते पाहून तुमच्याही मनात सगळ्यांना कडक सॅल्यूट ठोकण्याचा विचार नक्कीच येईल.
अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील आहे. यात बघायला मिळत आहे की, कशाप्रकारे लोकांनी एकत्र येऊन कार उचलली आणि महिलेला सुरक्षित बाहेर काढलं.
एंजेलिना नावाच्या एका ट्विटर यूजरने या घटनेबाबत सांगितले. तिने लिहिले की, 'मी तिथेच होते. जी महिला कार होती होती, तिचा पाय मोडला असता तर कारमधील महिलेने वेळीच ब्रेक लावला नसता'. जी महिला कारखाली आली होती तिने नंतर माध्यमांना सांगितले की, 'मी रस्ता क्रॉस करत होते. तेव्हा अचानक एक कार आली आणि मला टक्कर दिली. मी कारखाली आले'.