चीनमधील सगळ्यात उंच धबधबा सध्या एका वेगळ्या कारणाने सोशल मीडियावर चर्चेत आहे. चीनमधील युंटाई माउंटेनवरचा धबधबा ट्रोल होत आहे. कारण या धबधब्याबाबत एक सत्य समोर आलं आहे. सत्यामुळे चीनची पोलखोल झाली आहे. चीनच्या वस्तूंवर नेहमीच मीम्स बनत असतात. आता हा धबधबाही या मीम्सचा भाग होत आहे.
‘एक्स’ ‘@unlimited_ls’ नावाच्या हॅंडलवर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा धबधबा दुरून खूपच सुंदर दिसतो. पण हा धबधबा वरून जेव्हा जवळून पाहिला गेला तेव्हा मात्र या धबधब्याची पोलखोल झाली. या धबधब्या नेहमीच खोटं सांगणार आलं होतं की, हा नॅचरल आहे. पण त्यातून पाइपने पाणी सोडलं जातं.
एका हायकरने डोंगरावर हायकिंग करण्याचा निर्णय घेतला आणि तो धबधब्याजवळ वर गेला. इथे त्याला जे दिसलं ते पाहून तो हैराण झाला. पाइपलाईनचा त्याने व्हिडीओ काढला आणि सोशल मीडियावर शेअर केला.
पोस्टमध्ये सांगण्यात आलं की, चीनच्या अधिकाऱ्यांना एका हायकरने या धबधब्याची पोलखोल केल्यावर लोकांची माफी मागावी लागली आहे. १,०२४ फूट उंच हा धबधबा बघण्यासाठी दरवर्षी लाखो लोक येतात.
पण आता सोशल मीडियावर याची पोलखोल झाल्याने लोक मजेदार कमेंट्स करत आहेत. मीम्स शेअर करत आहेत. एकाने लिहिलं की, तिथे एक दुसरा पाइपही आहे. असं वाटतं तो सुरू करून लोकांमध्ये भ्रम निर्माण करतात की, हा खरा धबधबा आहे.