Viral Video : मध आपल्या आरोग्यासाठी वेगवेगळ्या दृष्टीने फायदेशीर असतं. बाजारात वेगवेगळ्या कंपन्यांचं पॅक्ड मध मिळतं. ज्यातील शुद्ध कोणतं आणि भेसळयुक्त कोणतं हे ओळखणं फारच अवघड काम असतं. अशात सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे ज्यात एक व्यक्ती शुद्ध मध कसं ओळखायचं याबाबत सांगत आहे. हा व्हिडीओ तुम्हाला शुद्ध अशुद्ध मध ओळखण्यासाठी मदत करू शकतो.
तसे तर मधाची शुद्धता चेक करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. पण या व्हायरल व्हिडिओत या व्यक्तीने एक वेगळीच पद्धत सांगितली आहे. व्यक्ती मधाचा एक थेंब आपल्या टी-शर्टवर लावतो आणि लावल्यावर व्यक्ती लगेच आपल्या हातावरूनही मध काढतो. तुम्ही बघू शकता की, टी-शर्ट पूर्णपणे साफ होते. कोणताही डाग त्यावर दिसत नाही. मध विकणाऱ्या व्यक्तीने सांगितलं की, मध जर शुद्ध असेल तर कपड्यावर कोणताही डाग दिसणार नाही. तर भेसळयुक्त मध कपड्यावर चिकटतं.
इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ foody_rahul_ नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. याच्या कॅप्शनला लिहिण्यात आले आहे की, टी-शर्टवर हनी टेस्ट. लोक या व्हिडिओवर वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. एकाने लिहिलं की, 'आजकाल विष सोडून काहीच शुद्ध मिळत नाही'. तर दुसऱ्याने लिहिलं की, '२ किलो मध घेतलं होतं ते भेसळयुक्त निघालं'. तिसऱ्याने लिहिलं की, 'आयुष्य शुद्ध आणि अशुद्धची ओळख पटवण्यातच जात आहे'.