लॉकडाऊनमध्ये पोलिस कर्तव्यावर हजर असताना कोणकोणत्या प्रसंगांना तोंड द्यावे लागते. याचे वेगवेगळे व्हिडीओज व्हायरल होत असतात. सोशल मीडियावर कोरोना कर्फ्यूमध्ये ड्युटीवर असलेल्या एका पोलिसाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही चकीत व्हाल. एका चिमुरडीने समजूतदारपणानं दांडा पोलिसांच्या हातात आणून दिला आहे. हा व्हिडिओ आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी एक मजेदार कॅप्शन देत शेअर केला आहे.
रस्त्यात अनेक पोलिस उभे असल्याचे व्हिडिओमध्ये पाहता येईल. एक मुलगी हातात काठी घेऊन पोलिसांकडे आली. या १० सेकंदाच्या व्हिडीओनं अनेकांचे मन जिंकले आहे. व्हिडिओ शेअर करताना आयपीएस अधिकारी दीपांशु काब्रा यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'निर्दोष बालपणालाही परिस्थिती कशी आहे हे माहिती आहे.' यासह, त्यांनी हसणारा इमोजी देखील शेअर केला आहे.
हा व्हिडिओ त्यांनी ४ मे रोजी शेअर केला होता. ज्या व्हिडीओला आतापर्यंत ४ हजारांपेक्षा व्हिव्हज मिळाले असून ६०० पेक्षा जास्त लाईक्स या व्हिडीओला मिळाले आहेत. तर ८० पेक्षा अधिक लोकांना हा व्हिडीओ रिट्विट केला आहे. कमेंट विभागात, लोकांनी गमतीदार अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.
मास्क लावल्याने गुदमरल्यासारखं होतं का?... मग या साध्या-सोप्या टिप्स वाचाच!
एकाच बाईकवर अख्खी जत्रा घेऊन लग्नाला निघाला
सोशल मीडियावर लॉकडाऊनचा फोटो तुफान व्हायरल होत आहे. कुटुंबातील ६ लोक एकाच एकाच बाईकवर बसून लग्नाला जात होते. आता तुम्ही म्हणाल दोन सीट्सच्या बाईकवर इतके लोक कसे काय बसतील? हा फोटो पाहून तुमची झोप उडाल्याशिवाय राहणार नाही. आयपीएस अधिकारी दिपांशू काबरा यांनी हा फोटो आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. या फोटोला त्यांनी कॅप्शन दिलं आहे की, 'लग्नाला जायचं होतं म्हणून मास्क लावला आणि #Roadsefty ला ठेंगा'. असं गमतीदार कॅप्शन या फोटोला देण्यात आलं आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार संपूर्ण कुटुंब कर्फ्यूच्या काळात एका लग्नाला हजेरी लावण्यासाठी जात होते. त्यावेळी पोलिसांना त्यांना अडवलं. या सगळ्यांनी मास्क तर लावले होते. पण सोशल डिस्टेंसिंग आणि वाहतुकीच्या नियमांना मात्र चांगलंच धाब्यावर बसवलं होतं. पोलिसांनी सुरूवातीला या लोकांना हात जोडले. त्यानंतर चालान कापून चालकाची समजूत काढून त्याला घरी पाठवण्यात आलं.