सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ तूफान व्हायरल होत आहे. गेल्या 22 मार्चला संपूर्ण देशात जनता कर्फ्यू लावण्यात आला होता. कोरोनाचा व्हायरस पसरू नये म्हणून हा लॉकडाउन करण्यात आला होता. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना सांयकाळी 5 वाजता टाळ्या आणि थाळ्या वाजवून डॉक्टर, नर्स, पोलिसांबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यास सांगितले होते. त्यादरम्यानचा हा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही नक्कीच म्हणाल की, या व्यक्तीला ऑक्सर दिला जावा.
थाळी वाजवण्याच्या जुगाडाचा हा व्हिडीओ अनू सेहगल नावाच्या ट्विटर यूजरने शेअर केलाय. त्याने कॅप्शन लिहिलं की, 'थाळी वाजण्याच्या सर्वात वेगळ्या आयडियाचा अवॉर्ड या व्यक्तीला जातो'. हा व्हिडीओ व्हायरल झाला असून 25 हजार वेळा पाहिला गेलाय.
या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, पंख्याच्या मोटरसोबत एक चमचा बांधला आहे. पंख्याच्या काही अंतरावर एक थाळी बांधली आहे. म्हणजे पंखा जेव्हा सुरू होते तेव्हा चमचा थाळीवर आदळतो. ज्यातून टन-टन आवाज येतो. लोक हा व्हिडीओ आणि त्यातील जुगाड पाहून हैराण झाले आहेत.