तुम्हाला वन्यजीवांचे व्हिडिओ पाहण्याची आवड असेल तर बिबट्या आणि त्याच्या पिल्लांचा व्हिडीओ तुम्हाला खूप आवडेल. लॉकडाऊनच्या काळात वन्य जीवातील अनेक व्हिडीओ व्हायरल झाले होते. मोकळ्या रस्त्यावर जंगलातील प्राण्यांचा संचार सुरू होता. ५१ सेकंदाचा हा व्हिडीओ आयएएस अधिकारी डॉ. एम.व्ही. राव यांनी ट्विटरवर लक्षणीय कॅप्शनसह पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये एका बिबटयाने आपल्या पिल्लांसह जंगलांच्या दरम्यानचा रस्ता ओलांडला.
वाहनांमधून, पर्यटकांनी या बिबट्याचा व्हिडीओ रेकॉर्ड केला. ती रस्त्यावरुन जात असताना पिल्लू त्यांच्या आईची आज्ञा पाळण्यास तयार नव्हते. त्यानंतर आईच्या मागे पिल्लं चालू लागली आहेत. सुरूवातीला ही पिल्लं खेळण्यात व्यस्त होती. त्यानंतर आईने या पिल्लांना रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला नेलं आहे. या व्हिडीओमध्ये वन अधिकारी सुशांत नंदा यांनाही टॅग केलं आहे. वाह, नशिब चमकलं! भारताच्या 'या' गावात सापडलं हिऱ्याचं भांडार; अन् लोकांना कळताच.....
मूळ मालकांना त्यांच्या मार्गावर जाऊ द्या," असं कॅप्शन या पोस्टला दिलं आहे. या व्हिडीओला सोशल मीडिया युजर्सनी पसंती दिली आहे. आतापर्यंत ६०० पेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. १०० पेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केले आहे. लय भारी! माय लेकाची बातच न्यारी, पत्नी किंवा प्रेयसी नाही तर आईसोबत करतोय परदेशवारी