Shocking Video: एका लहान मुलीच्या रेस्क्यूचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात एक लहान मुलगी खेळता खेळता मेट्रो स्टेशनच्या ग्रिलवर गेली. पण तिथे अडकली आणि जोरजोरात रडू लागली. मुलीचा रडण्याचा आवाज ऐकत एक सीआयएसएप जवान तिला वाचवण्यासाठी तिथे पोहोचला. याच घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका आयएएस अधिकाऱ्यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओतील जवानाचं भरभरून कौतुक केलं जात आहे.
ही घटना दिल्लीच्या निर्माण विहार मेट्रो स्टेशनवर घडली. इथे एक मुलगी खेळता खेळता एका बिल्डींगच्या रेलिंगवर पोहोचली. प्रश्न हा उपस्थित होत आहे की, ती मुलगी इतक्या लहान जागेवर गेली कशी? सीआयएसएफ जवानाला मुलीला तेथून बाहेर काढण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागली. मुलीचा परिवार मेट्रो स्टेशनच्या खाली राहणारा असल्याचं सांगितलं जात आहे. जशी सीआयएसएफ जवानाला मुलगी अडकल्याची सूचना मिळाली तो तिथे पोहोचला.
मुलीला सुरक्षित बाहेर काढतानाचा त्याचा व्हिडीओ रेकॉर्ड करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला. हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला ज्यामुळे तो व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. १ मिनिट १५ सेकंदाचा हा व्हिडीओ सगळेजण जवानाचं भरभरून कौतुक करत आहेत.