Social Viral : जुगाड आहे तर काहीही शक्य आहे. जुगाडाबाबत सांगायचं तर भारतात जुगाडाशिवाय काम होत नाही. कोणतंही काम सोपं करण्यासाठी लोक जुगाडाची पद्धत वापरतात. किंवा असं म्हणा की भारतीय लोकांना जुगाडाची सवय पडली आहे. लोक प्रत्येक कामासाठी जुगाड वापरतात. असंच एक उदाहरण आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. अनेकदा तर अशक्य कामही जुगाडानेच शक्य होतं.
जर तुमच्याकडे मोठी गाडी नसेल आणि तुमचा परिवार मोठा असेल तर, अशात इतका मोठा परिवार घेऊन बाहेर कसं जायचं असा प्रश्न पडतो. अशात अनेकदा एकाच परिवारातील सगळे लोक एकत्र बाहेर जाऊ शकत नाहीत. पण एका व्यक्तीने असं डोकं लावलं की, त्याचा पूर्ण परिवार एकाच वेळी बाहेर जाऊ शकतो. तेही एकाच गाडीवर बसून.व्हायरल झालेला हा व्हिडीओ ट्विटरवर @adilnargolwala नावाच्या यूजरने शेअर केला आहे.
व्हिडीओसोबत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, गरज ही सर्व आविष्कारांची जननी आहे. व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, एक व्यक्तीने दोन स्कूटर एकत्र जोडून एक मोठी स्कूटर तयार केली. त्याने एका स्कूटरचा मागचा भाग काढला आणि दुसऱ्या स्कूटरचा पुढचा भाग काढला. ते दोन्ही भाग जोडले. ज्यामुळे स्कूटर मोठी झाली. यावर चार लोक सहजपणे बसू शकतात.