आयुष्य प्रत्येकासाठी सारखं नसतं. प्रत्येकाच्या आयुष्यात चढ-उतार हे येत असतात. आयुष्य आणखी चांगलं करण्यासाठी दररोज आपल्याला आपल्या नशिबाशी लढावं लागतं. आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी प्रत्येक जण धडपडत असतो. कष्ट करत असतो. अशीच एक प्रेरणादायी गोष्ट आता समोर आली आहे. एक पाय नसलेली व्यक्ती आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी रात्रंदिवस काम करत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.
सोशल मीडियावर या व्यक्तीचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. सर्वजण या व्यक्तीच्या जिद्दीला सलाम करत आहेत. एक पाय नसलेली व्यक्ती मजुरीचं काम करताना दिसत आहे. कोणाचीही मदत न घेता तो कष्ट करत आहे. जीवनात तक्रार करणं सोडून देऊन आनंदाने जगलं पाहिजे हा संदेश या व्यक्तीने दिला आहे. तसेच पाय नसतानाही तो आपल्या मेहनतीने, सन्मानाने जीवन जगत आहे.
आपल्यापैकी बहुतेकजण जीवनाचे महत्त्व समजून घेण्यात अपयशी ठरतात आणि छोट्या छोट्या गोष्टींसाठी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतात. अशा परिस्थितीत ही व्यक्ती कष्ट केले पाहिजेत, हार मानू नये याचं एक उत्तम उदाहरण आहे. एका ट्विटर युजरने या व्यक्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केल्यावर या माणसाची गोष्ट व्हायरल झाली आहे.
व्हिडीओ शेअर करताना एका ट्विटर युजरने लिहिलं की, "काही लोक आत्महत्या करतात, पण काही जीवनातील आव्हानांना तोंड देण्यासाठी तयार असतात. देव तुझे भले करो." हा व्हिडिओ हजारो लोकांनी पाहिला आहे आणि दिवसेंदिवस ही संख्या वाढतच आहे. ट्विटर युजर्सनी या व्यक्तीचं भरभरून कौतुक केलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.