भारतात कोरोना विषाणूंचा प्रसार वेगाने होत आहे. घरी राहून लोक कोरोना विषाणूंच्या संसर्गापासून बचाव करत आहेत. ज्यांना महत्वाचं काम आहे असे लोक घराबाहेर पडत आहेत. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठया प्रमाणावर व्हायरल होत आहे. सोशल मीडिया युजर्सनी या व्हिडीओला खूप पसंती दिली आहे. या व्यक्तीने देशी जुगाड करून फेस शिल्ड तयार केला आहे. आयएएस अधिकारी अवनीश शरण यांना या व्यक्तीचा जुगाड खूप आवडला आहे. त्यांनीच हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. सध्या हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एका माणसाने हातात सॉफ्ट ड्रिंकची बाटली घेतली आहे. त्यानंतर कॅमेराला बॉटल दाखवून बॉटलचा खालचा भाग कापून टाकला आहे. त्यानंतर मधून कापलं आहे. त्यानंतर ती बाटली आपल्या तोंडावर लावली आहे. असा देशी जुगाड करून त्यांनी फ्रीमध्ये फेसशिल्ड तयार केलं आहे. आयएफएस अधिकारी अवनीश यांना नवा जुगाड खूप आवडला आहे.
हा व्हिडीओ २९ जुलैला दुपारी शेअर करण्यात आला होता. या व्हिडीओला आतापर्यंत ११ हजारांपेक्षा जास्त व्हिव्हज मिळाले आहेत. तसंच एक हजारांपेक्षा जास्त लाईक्स आणि २०० पेक्षा जास्त कमेंट्स मिळाल्या आहेत. लोकांनी या व्हिडीओला खूप पसंती दिली आहे. आधीही असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता.
त्या व्हिडीओत या कुकरची शिटी काढून पाईप जोडलेला आहे. कुकरमधून बाहेर येत असलेल्या वाफेने भाज्या आणि फळं सॅनिटाईज होत आहेत. भाज्या धुत असलेल्या माणसाच्यामते गरम पाण्यामुळे भाज्या खराब होण्याची शक्यता असते. पण वाफेद्वारे स्वच्छ करण्यात आलेल्या भाज्या स्पर्श न करताही चांगल्या साफ होतात. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता. प्रेशर कुकरच्या वाफेने भाज्या धुण्याचा नवीन जुगाड शोधून काढला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर आयएएस सुप्रिया साहू यांनी शेअर केला होता. भाज्या सॅनिटाईज करण्याचा अजब जुगाड असे या व्हिडीओला कॅप्शन देण्यात आलं आहे.
दालचिनीच्या सेवनाने होतात 'हे' ६ फायदे; कोरोनाशी लढण्यासाठी रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास होईल मदत
जास्त खाणं सोडाल तरच कोविड 19 मुळे होणाऱ्या मृत्यूचा टळेल धोका, 'या' देशातील आरोग्यमंत्र्यांचा सल्ला