Viral Video : समुद्रातील उंच लाटा जेव्हा तटावर येतात तेव्हा किनाऱ्यावरील लोकांच्या मनात धडकी भरते. कारण या लाटा सगळं आपल्यासोबत घेऊन जाऊ शकतात. एक समुद्राच्या १०० फूट उंच लाटेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. महत्वाची बाब म्हणजे या लाटेसमोर एक व्यक्ती सर्फिंग करत आहे. हा थरारक व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमची बोलती बंद होईल.
एका जर्मन सर्फरने अनोखा कारनामा करून दाखवला. त्याने ११५ फूटांपेक्षा जास्त उंच लाटांसमोर सर्फिंग केली. आता त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जर्मनी येथील नूर्नबर्गच्या सेबेस्टियन स्टुड्टनरने ११५ फूट उंच ब्रोबडिंगनागियन लाटेवर सर्फिंग करत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. हा व्हिडीओ २०१८ सालातील असून आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पोर्तुगालमधील प्रिया डे नॉर्टमध्ये आयोजित वर्ल्ड सर्फ लीगचा होता.
या जबरदस्त व्हिडीओत स्टुड्टनर सहजपणे सर्फिंग करताना दिसला होता. जे बघणं फारच दुर्मीळ होतं. या व्हिडीओला आतापर्यंत ३.८ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत आणि हजारो लोकांनी यावर कमेंट्स केल्या आहेत. स्टुड्टनरचं हे अद्भुत कौशल्य पाहून लोक दंग झाले होते आणि त्याचं लोकांनी भरभरून कौतुक केलं होतं. हा व्हिडीओ वर्ल्ड सर्फ लीगच्या यूट्यूब पेजवरही शेअर करण्यात आला होता.