'दम लगाके हईशा' सिनेमा तुम्ही पाहिला असेलच. त्यात आयुष्यमान खुराणा हा त्याच्या पत्नीला पाठीवर घेऊन एका शर्यतीत धावतो. ही शर्यत तो जिंकतो आणि बायकोचंही मन जिंकतो. अशीच एक स्पर्धा सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. यात पतीने पत्नीला खांद्यांवर घेऊन पळायचं होतं. नुकसंच पळायचं नाही तर वेगवेगळे टास्कही करायचे होते.
Wife Carrying World Champion असं या स्पर्धेला म्हटलं जातं. पत्नीला खांद्यावर घेऊन वेगवेगेळे अडथळे पार करावे लागतात, आणि जे हे करेल तो विजेता ठरतो. ही स्पर्धा Vytautas Kirkliauskas आणि Neringa Kirkliauskiene यांनी फिनलॅंडमध्ये जिंकली. ही रेस २५३ मीटरची असते. या जोडीने ही रेस १ मिनिट ६ सेकंदात पूर्ण केली. या रेसमध्ये वेगवेगळ्या देशांच्या लोकांनी भाग घेतला होता. महत्त्वाची बाब म्हणजे गेल्यावर्षी सुद्धा याच जोडीने ही रेस जिंकली होती.
कपलने रेस जिंकल्यावर सांगितले की, त्यांना वाटत होतं की, ते रेस हरणार आहेत. ते सतत वेळ बघत होते. पण तसं झालं नाही. आम्ही जिंकलो. यासाठी त्यांनी पत्नीने आभार मानले. तसेच ते म्हणाले की, याप्रकारच्या रेसमुळे पती-पत्नींमधील विश्वास वाढतो.