जगात आईच्या प्रेमाची तुलना कशाशीही होऊ शकत नाही. हे तुम्हाला माहीतच असेलच. आपल्या पिल्लाला वाचवण्यासाठी आईची धडपड अनेक घटनांमधून दिसून येते. खासकरून प्राण्यांमध्ये असे प्रकार अनेकदा पाहायला मिळतात. सोशल मीडियावर अशीच अशीच एक घटना व्हायरल होत आहे. एक माकड आपल्या पिल्लाला वाचवण्यासाठी जीवाशी खेळला आहे. हा व्हिडीओ पाहून लोक खूप भावूक झाले आहेत.
आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. या फोटोला त्यांनी कॅप्शन दिलं आहे की, माँ तुझे सलाम. आतापर्यंत या व्हिडीओला २५ हजारांपेक्षा जास्त लोकांनी पाहिलं असून ३ हजारापेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे. तर ५०० पेक्षा अधिक लोकांनी हा व्हिडीओ रिट्विट केला आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता माकडाचं पिल्लू विहिरीत पडलं आहे. या पिल्लाला बाहेर काढण्यासाठी माकडाचे प्रयत्न सुरू आहेत. माकडाने पिल्लाला वाचवण्यासाठी शेपटीचा वापर केला आहे. व्हिडीओ काढत असलेल्या माणसानं या माकडाची मदत करायला हवी होती. अश्याही कमेंट्स अनेकांकडून आल्या आहेत.
दरम्यान आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी एक जुना व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला होता. या व्हिडीओला कॅप्शन दिलं आहे की, जर तुम्ही आईचं साहस पाहिलं नसेल तर हा व्हिडीओ नक्की पाहा. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता सापाने एका उंदराच्या पिल्लाला तोंडात धरले आहे. या उंदराच्या पिल्लाला सापाच्या तावडीतून सोडवण्यासाठी दुसरा उंदिर प्रयत्न करत आहे. थरारक! नदीवर पाणी पिण्यासाठी आला चित्ता, काही सेकंदात मगरीने झडप घातली मग..., पाहा व्हिडीओ
आपल्या जीवाशी खेळत पिल्लाला वाचवण्याकरता उंदीर सापाच्या मागे पळत आहे. अखेर उंदराच्या प्रयत्नांना यश मिळते आणि सापाच्या तावडीतून उंदरांच्या पिल्लाची सुटका होते. त्यानंतर साप गवताच्या दिशेने लांब निघून जातो. साप पूर्ण लांब निघून गेलाय ना, याची खात्री करून मगच उंदीर आपल्या पिल्लाकडे परत येतो. ६६ वर्षीय गृहस्थानं केलं दुसरं लग्न; अन् सावत्र आईसह वडिलांचा फोटो पोस्ट करत लेक म्हणाला.....