Delhi Sarojini Market Fight: पुरुषांपेक्षा महिलांमध्ये कपड्यांच्या खरेदीचे मोठ्या प्रमाणावर आकर्षण असतं. त्यामुळे अनेकदा पुरुषांच्या तुलनेने महिलांचे कपडे अगदी स्वस्त दरात मिळतात. मग ते मुंबईतील लिंकिंग रोड असो की दिल्लीतील सरोजिनी नगर मार्केट. या ठिकाणी महिलांचा नेहमीच झुंबड उडालेली पाहायला मिळते. मात्र कधीकधी या ठिकाणी महिलांमध्ये कपड्यांवरुन वादही झाल्याचे पाहायला मिळतात. असाच प्रकार दिल्लीच्या सरोजिनी मार्केटमध्ये घडला. एका कपड्यावरुन दोन महिलांमध्ये वाद इतका वाढला की प्रकरण हाणामारीपर्यंत गेलं. या घटनेचा व्हिडीओ कुणीतरी काढला आणि आता तो तुफान व्हायरल होत आहे.
आपल्या आवडीचे कपडे मिळवण्यासाठी महिला नेहमीच खटाटोप करत असतात. पण जर एकच कपडा दोन महिलांना आवडल्यानंतर तो मिळवण्यासाठी स्त्रिया कोणत्या स्तरावर जातात याचा अनुभव दिल्लीकरांना आला. दिल्लीतील सरोजिनी नगर मार्केटमध्येही असाच प्रकार पाहायला मिळाला. मार्केटमध्ये दोन महिला एका कापडावरून एकमेकांशी भिडल्या. दोघांमध्ये जोरदार हाणामारी देखील झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एकाच वेळी दोन महिलांना एक कपडा आवडला होता. त्यावरुन दोन महिलांमध्ये जोरदार वाद झाला. त्यानंतर सूट घातलेल्या महिलेने दुसऱ्या महिलेला कानाखाली मारली. यानंतर संतप्त झालेल्या दुसऱ्या महिलेने प्रत्युत्तर दिले आणि तिला खाली पाडलं. सुरुवातीला एक महिला हे भांडण सोडवण्याचे प्रयत्न करत होती. मात्र नंतर ती सुद्धा या भांडणात सामील झाली आणि मारामारी करु लागली. कपड्यांच्या दुकानासमोरच वाद वाढू लागल्याने आजूबाजूच्या लोकांना हे भांडण थांबवण्याची विनंती केली मात्र कोणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतं.
हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून आजूबाजूचे लोक हे भांडण पाहण्यात व्यस्त असल्याचे दिसत आहेत. मग दोन्ही महिला सूट घातलेल्या महिलेचे केस ओढून तिला मारहाण करताना दिसत आहेत. भांडण पाहिल्यानंतर, एक महिला सूट घातलेल्या महिलेला बाजूला करण्याचा प्रयत्न करते.
दरम्यान, या व्हिडीओवर नेटकऱ्यांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने अशिक्षित लोकांबद्दल व्याख्याने देणाऱ्या लोकांना इथे टॅग करावेसे वाटते. यांना बघा मॉर्डन कपडे घातलेत तरी हासण्यासारखं काम करत आहे. चांगले कपडे घालून मानसिकता बदलत नाही, हे त्याचे उत्तम उदाहरण आहे, असं म्हटलं. तर दुसऱ्या एका युजरने कपड्यांच्या बाबतीत महिला कधीही तडजोड करत नाहीत, असं म्हटलं. आणखी एका युजरने ही दुकानदाराची चूक आहे, त्याने एकाच डिझाइनचे २ कपडे ठेवायला हवे होते, असं म्हटले.