लॉकडाऊनमुळे माणसं घरात आणि प्राणी घराबाहेर, असं चित्र गेल्या काही दिवसांपासून दिसत आहे. सर्वत्र शांतता असल्यामुळे विविध प्राणी पक्षी मुक्त संचार करत आहेत. काही दिवसांपूर्वी मुंबईतील रस्त्यावरील मोराचे फोटो व्हायरल झाले होते. गजबजलेल्या मुंबईत लॉकडाऊनच्या काळात मोराचं दर्शन सगळ्यांनाच झालं. सध्या असाच एक व्हिडीयो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या व्हिडीओत फक्त मोर नाही तर मोर उडताना कसा दिसतो. हे सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. असं सुंदर नयनरम्य दृश्य याआधी तुम्ही कधीही पाहिलं नसेल. हा व्हिडीओ रणथंबोर पार्कमधील आहे. हा व्हिडीओ वाईल्ड लाईफ फोटोग्राफर Harsha Narasimhamurthy यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. (हे पण वाचा-ट्रॅक्टरवर बसलेल्या शेतकऱ्यांवर वाघाने केला हल्ला, पहा व्हायरल व्हिडीओ)
हा व्हिडीओ कसा काढला याबाबत कॅप्शन दिलं आहे. ''हा व्हिडीओ मागच्या वर्षीच्या उन्हाळ्यातील असून जेव्हा मी रणथंबोर टायगर रिसर्व्हमध्ये जात होतो. त्यावेळी एक मोर उडण्याच्या तयारीत असताना मी हा व्हिडीओ स्लो मोशन मध्ये काढला'' असं हर्ष यांनी कॅप्शनमध्ये सांगितले आहे. या व्हिडीओवर कंमेंट्सचा वर्षाव करण्यात आला आहे. (हे पण वाचा-बापरे! बाईकवरून माकड आला अन् चिमुरडीला फरपटत घेऊन गेला, पहा व्हायरल व्हिडीओ)