पंजाबी लोक नेहमीच त्यांच्या दिलदारपणासाठी, त्यांच्या दमदार पर्सनॅलिटीसाठी ओळखले जातात. सध्या सोशल मीडियात एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पंजाबमधील मोगा शहरातील असून रस्त्यावर एका दुसऱ्या व्यक्तीने कार पार्क केली आहे. त्यामुळे रस्ता ब्लॉक झालाय. आता अर्थात अशावेळी भांडणं होतात हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. पण या पंजाबी व्यक्तीने काय ते पाहून लोक अवाक् झाले आहेत.
केवळ २९ मिनिटांचा हा व्हिडीओ तुम्हाला हैराण करून सोडायला पुरेसा आहे. हा व्हिडीओ ट्विटरवर अनिक चोपडा नावाच्या व्यक्तीने शेअर केलाय. अनिक चोपडा हे रिटायर्ड एअर मार्शल आहेत. त्यांनी हा व्हिडीओ शेअर करताना लिहिले की, 'कधी पंजाबी लोकांचा रस्ता अडवू नका. हे मोगात झालंय'.
या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, रस्त्यात आधीच एक कार पार्क केली असल्याने पंजाबी व्यक्तीला गाडी पुढे नेण्यास अडचण येत होती. मग काय पंजाबी व्यक्ती बाहेर आली आणि त्याने कार हातांनी उचलून एका बाजूला केली. आता यावरून त्या व्यक्तीच्या ताकदीचा अंदाज तुम्ही लावू शकता.
आता हा कारनामा पाहिल्यावर सोशल मीडियातील लोक खळबळून जागे होणार नाही असं तर होणार नाही. २० नोव्हेंबरला हा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. तेव्हापासून आतापर्यंत हा व्हिडीओ ३६ हजार पेक्षा अधिक लोकांनी पाहिला. तर या व्हिडीओला ४ हजार पेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. तसेच १ हजारपेक्षा अधिक लोकांनी हा व्हिडीओ रिट्विट केलाय.