गेल्या अनेक आठवड्यांपासून बिहारमध्ये निवडणूकांचे वारे वाहू लागले आहेत. अशा स्थितीत नेहमीच नेत्यांच्या मुलाखती आणि सर्वसामान्यांची मत जाणून घेतली जातात. एखाद्या विषयावर रिपोर्टरने प्रश्न विचारल्यानंतर अनेकांची तारांबळ उडते. नक्की काय बोलायला हवं हेच सुचत नाही. सध्या सोशल मीडियावर असाच गमतीदार व्हिडीओ व्हायरल होत आहे. एका न्यूज चॅनलच्या रिपोर्टरने बिहारमधील लखीसरायच्या एक ज्येष्ठ नागरिकाला विचारलं, की तुमच्या गावात विकास पोहोचला का? यावर आजोबांनी उत्तर दिलं, 'विकास, मी इथे नव्हतो सर..मी आजारी होतो म्हणून डॉक्टरकडे गेलो होतो..'
रिपोर्टरने स्थानिक लोकांना गावात झालेला विकास आणि एकूण स्थितीबद्दल प्रश्न विचारला होता. आजोबांच्या या उत्तरानंतर सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. अनेकांनी मीम्स तयार करीत सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत. हा व्हिडीओ वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉम्सवर शेअर केला जात आहे. सध्या बिहारच्या राजकारणात मोठा बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या निवडणुकीत शिवसेनाही लढणार असून दुसरीकेडे NDAमध्ये फुट पडली आहे. रामविलास पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षानेही स्वबळावर निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. नीतिश कुमार यांचे नेतृत्व आम्हाला मान्य नाही त्यामुळे आम्ही बाहर पडत असल्याचं पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी म्हटलं होतं. त्यामुळे राज्यात आता तिरंगी लढत होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. बाबो! जिराफानं गवत खाण्यासाठी केला भन्नाट जुगाड, ९० लाखांपेक्षा जास्तवेळा पाहिला गेला व्हिडीओ
त्यामुळे येत्या विधानसभा निवडणूकांमध्ये बिहारच्या राजकारणात कोण बाजी मारणार हे पाहणं महाराष्ट्रासाठीही महत्वाचं ठरणार आहे. या व्हिडीओला उमाशंकर सिंह यांनी ट्विटरवर शेअर केलं होतं. आतापर्यंत २७ हजारांपेक्षा जास्त लोकांनी लाईक केलं असून या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. चना मसाला, नान, चहा अन्.....", भारतीय पदार्थांबाबत तैवानच्या राष्ट्राध्यक्ष म्हणाल्या की....