जिराफ सर्वांत उंच प्राणी आहे. तो दिसायला एकदम शांत दिसतो परंतू तसा तो नाही. जंगलात राहताना जीव वाचविणे हिच प्रत्येक प्राण्याची भावना असते. जर कोणी मस्ती केली तर कुस्ती करण्याचीही तयारी या प्राण्यांची असते. झाले असे की, एक गेंडा जिराफाशी पंगा घेत होता. तेव्हा जिराफाने त्या गेंड्यावर अशी काही किक मारली की तो ही किक आयुष्यभर लक्षात ठेवणार आहे.
आय़एफएस अधिकारी सुशांता नंदा यांनी याचा व्हीडिओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, ही किक गेंडा आयुष्यभर लक्षात ठेवणार आहे. तुम्हाला माहिती आहे का, की जिराफ कोणत्याही दिशेने किक मारू शकतो. तसेच तुम्हाला माहिती आहे का कोणता प्राणी सर्वात जोराने लाथ मारतो, गुगल करू नका प्लीज.
या व्हीडिओला 10000 हून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. यामध्ये जिराफ झाडाखाली उभा असताना त्याच्या पाठीमागून गेंडा येत असल्याचे दिसत आहे. गेंड्याने जिराफाच्या पायावर टक्कर मारताच जिराफ जोरात लाथ मारतो. ही लाथ गेंड्याच्या डोक्यावर बसते आणि गेंडा 100 च्या स्पीडने पळून जातो.
नंदा यांच्या प्रश्नाचे उत्तरही लोकांनी देण्यास सुरुवात केली. कांगारू हा प्राणी सर्वाधिक ताकदीची किक हाणतो. तर काहींनी यावर मस्करी करण्यासही सुरुवात केली आहे. काहींनी हा जिराफ नसून झेब्रा असल्याचे म्हटले आहे. तर काहींनी सर्वात वेगाने किक मारणारा प्राणी जिराफच असेल, कारण गेंड्याला ती लागली, असे म्हटले आहे. तर काहींनी सलमान भाईची किक असे म्हटले आहे.