VIDEO: 'साहेब, मुलगा दारू पिऊन मारतो', वृद्धाची तक्रार ऐकताच DSP ने त्यांना गाडीत बसवलं अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2023 04:33 PM2023-04-11T16:33:41+5:302023-04-11T16:34:38+5:30
हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय.
एक व्यक्ती आपल्या वृद्ध आई-वडिलांना दारू पिऊन रोज मारायचा. त्याची तक्रार घेऊन वडील पोलिसांकडे गेले. त्यांचे म्हणने ऐकून घेतल्यानंतर डीएसपी संतोष पटेल यांनी त्या वृद्धाला आपल्या गाडीत बसवून थेट गाव गाठले. पोलिसांना पाहताच मुलगा आपल्या वृद्ध वडिलांच्या पाया पडला आणि त्यांची माफी मागू लागला. या घटनेचा व्हिडिओ स्वतः डीएसपींनी ट्विटरवर शेअर केला आहे.
बुजुर्ग सामान्यतः कार्यालय के बाहर जूते उतारकर आते हैं शायद पुलिस के प्रति उनके मन में न्याय, राहत, मदद पाने की आस्था होती है। एक बुजुर्ग जिनका शराबी बेटा पत्नी व उनकी मारपीट करता है। मौके पर लड़का पिता के पैरों में दण्डवत माफी मांगने लगा तो लगा पुलिस की नौकरी में ही यह सम्भव है। pic.twitter.com/Mae9ruxCmr
— Santosh Patel DSP (@Santoshpateldsp) April 10, 2023
डीएसपी संतोष पटेल सध्या मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर जिल्ह्यात तैनात आहेत. ते सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. अलीकडेच त्यांनी एका तक्रारदाराचा व्हिडिओ शेअर केला, जो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले- सहसा वृद्ध व्यक्ती शूज काढून ऑफिसमध्ये येतात. त्यांना न्याय आणि मदत मिळेल, असा पोलिसांवर विश्वास असेल. एक म्हातारा माणूस ज्याला त्याचा दारुडा मुलगा मारहाण करतो, तो तक्रार घेऊन आला होता. त्याच्या गावी गेल्यावर मुलाने वडिलांचे पाय धरले आणि माफी मागितली.
'जमिनीवर बसू नका, खुर्चीवर बसा'
मद्यधुंद मुलामुळे त्रासलेला वृद्ध व्यक्ती डीएसपी संतोष यांच्याकडे तक्रार घेऊन आल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. ते व्यक्ती खाली बसतो, पण डीएसपी त्याला आदराने खुर्चीवर बसवतात. यानंतर डीएसपी वृद्धाला त्यांच्या गाडीत बसवून त्यांच्या गावी घेऊन जातात. पोलीस गावात पोहोचताच वृद्धाच्या मुलाने वडिलांच्या पाया पडून माफी मागायला सुरुवात केली. यावर डीएसपी त्या व्यक्तीला आपल्या मुलाला माफ करण्यास आणि त्याच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद द्यायला सांगतात.
वाह..क्या खूबसूरत लिखा है..एक दिन वर्षों का संघर्ष, बहुत खूबसूरत तरीके से तुमसे टकरायेगा...#Sigmond#frayadhttps://t.co/0ht6uo5E6B
— Santosh Patel DSP (@Santoshpateldsp) February 28, 2023
संतोष पटेल या व्हिडिओमुळे चर्चेत
काही दिवसांपूर्वी डीसएपी संतोष पटेल शेतात गवत कापत असलेल्या आपल्या आईला भेटण्यासाठी गेले होते. यावेळी त्या दोघांचे संभाषण सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले. संतोष यांनी सांगितले की, डीएसपी होऊन 5 वर्षे झाली आहेत, पण गणवेशात पहिल्यांदाच आईसमोर आलो.