एक व्यक्ती आपल्या वृद्ध आई-वडिलांना दारू पिऊन रोज मारायचा. त्याची तक्रार घेऊन वडील पोलिसांकडे गेले. त्यांचे म्हणने ऐकून घेतल्यानंतर डीएसपी संतोष पटेल यांनी त्या वृद्धाला आपल्या गाडीत बसवून थेट गाव गाठले. पोलिसांना पाहताच मुलगा आपल्या वृद्ध वडिलांच्या पाया पडला आणि त्यांची माफी मागू लागला. या घटनेचा व्हिडिओ स्वतः डीएसपींनी ट्विटरवर शेअर केला आहे.
'जमिनीवर बसू नका, खुर्चीवर बसा'मद्यधुंद मुलामुळे त्रासलेला वृद्ध व्यक्ती डीएसपी संतोष यांच्याकडे तक्रार घेऊन आल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. ते व्यक्ती खाली बसतो, पण डीएसपी त्याला आदराने खुर्चीवर बसवतात. यानंतर डीएसपी वृद्धाला त्यांच्या गाडीत बसवून त्यांच्या गावी घेऊन जातात. पोलीस गावात पोहोचताच वृद्धाच्या मुलाने वडिलांच्या पाया पडून माफी मागायला सुरुवात केली. यावर डीएसपी त्या व्यक्तीला आपल्या मुलाला माफ करण्यास आणि त्याच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद द्यायला सांगतात.
संतोष पटेल या व्हिडिओमुळे चर्चेत काही दिवसांपूर्वी डीसएपी संतोष पटेल शेतात गवत कापत असलेल्या आपल्या आईला भेटण्यासाठी गेले होते. यावेळी त्या दोघांचे संभाषण सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले. संतोष यांनी सांगितले की, डीएसपी होऊन 5 वर्षे झाली आहेत, पण गणवेशात पहिल्यांदाच आईसमोर आलो.