Trending Video : तुम्ही गायींच्यातस्करीबद्दल अनेकदा ऐकले असेल आणि अशी अनेक प्रकरणेही पाहिली असतील, ज्यामध्ये लोक वेगवेगळ्या मार्गांनी गायींचीतस्करी करतात. भारतात गायींची तस्करी आणि कत्तल करणे कायद्याने गुन्हा आहे. तरीदेखील गायींच्या तस्करीसाठी गुन्हेगार वेगवेगळ्या युक्त्या वापरताना दिसतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुमचाही संताप उडेल.
पेट्रोल टँकरमधून गायींची तस्करीसोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये चक्क एका पेट्रोल टँकरमधून गायींची तस्करी केल्याचे दिसत आहे. पेट्रोल टँकर क्रमांक JK03 E 5451 हा जम्मू-काश्मीरमधील नोंदणीकृत असून, याच्या मागील बाजूस एक बनावट पेट्रोल टँकर लावण्यात आले आहे. बाहेरुन पाहिल्यानंतर कोणालाही हा सामान्य पेट्रोल टँकर असल्याचे वाटेल. पण, त्यात चक्क अनेक गायींची तस्करी केली जात आहे.
बुलडोझरच्या सहाय्याने टँकर तोडून गायींची सुटका मिळालेल्या माहितीनुसार, हा टँकर कठुआ येथे आल्यावर स्थानिकांना हा प्रकार कळताच त्यांनी टँकर थांबवला आणि बुलडोझरच्या सहाय्याने टँकर तोडण्यात आला. बुलडोझरने टँकर फोडताच त्यामध्ये गायींचा कळप आढळला. अनेक गायींना टँकरमध्ये बांधून ठेवण्यात आले होते. या टँकरमध्ये 20-25 गायींना डांबवून ठेवल्याचा अंदाज आहे. ही घटना पाहून अनेकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून टँकर आणि चालकाला ताब्यात घेतले.
@KreatelyMedia नावाच्या X अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 6 लाखांहून अधिक लोकांनी पाहिले असून, अनेकांनी व्हिडिओवर कमेंट करुन आपली नाराजी व्यक्त केली.