Snow Leopard Video : तुम्ही बिबट्या अनेकदा पाहिला असेल. पण, स्नो लेपर्ड पाहण्याची संधी क्वचितच कुणाला मिळते. हा बिबट्या बर्फाळ प्रदेशात आढळतो. हा शिकार करण्यात एवढा चपळ आहे की, त्याला 'पर्वतांमधील भूत' असेही म्हटले जाते. हिमालयातील हिमशिखरांवर हा प्रामुख्याने आढळतो. हा शिकार करण्यात इतका निपुण आहे की, आपल्या भक्षाचा जीव गेल्याशिवाय तो त्यांना सोडत नाही. असाच एक व्हिडिओ समोर आला आहे, जो पाहून तुमचाही डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.
व्हिडिओमध्ये एक हिम बिबट्या वाऱ्याच्या वेगाने हरणाची शिकार करताना दिसत आहे. यावेळी हरिण आणि बिबट्या उंच डोंगरावरुन खाली कोसळतात, ते अनेकदा बर्फावर आणि खडकांवर आपटतात, पण बिबट्या आपले भक्ष सोडत नाही. 31 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये हिम बिबट्या डोंगरावरुन हरणासोबत अनेक फूट खाली कोसळताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही त्याला 'पर्वतांचे भूत' म्हणाल.
हा व्हिडिओ ट्विटरवर @the_wildindia या हँडलने शेअर केला आहे, तर IFS परवीन कासवान यांनी त्यांच्या अकाऊंटवर रिट्विट केला आहे. यासोबतच 'घोस्ट ऑफ द माउंट्स इन अॅक्शन,' असे कॅप्शनही दिले आहे. पोस्ट आतापर्यंत 2.5 लाखांहून अधिक वेळा पाहिली गेली आहे. या व्हिडिओवर अनेकांच्या प्रतिक्रियाही येत आहेत.