Cheetah Running Viral Video: सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. नुकताच एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक चित्ता खूप वेगानं पळताना दिसत आहे. चित्ता पळणे ही काही मोठी गोष्ट नाही किंवा नवीन गोष्ट नाही. पण ज्या पद्धतीनं हा व्हिडीओ रेकॉर्ड करण्यात आला आहे आणि ज्या पद्धतीनं चित्ता पळताना दाखवण्यात आला आहे ते पाहणे आश्चर्यकारक आहे.
धावत्या कॅमेऱ्यानं Video शूट एका यूजरनं हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये एक चिता अतिशय वेगानं धावताना दिसत आहे. चालत्या कॅमेऱ्याच्या मदतीनं हा व्हिडिओ शूट करण्यात आल्याचं दिसतंय. चित्ता हा खूप वेगानं पळतो, पण या व्हिडिओला स्लो मोशनमध्ये दाखवण्यात आले आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही मंत्रमुग्ध व्हाल.
चित्त्याची 22 फूट उडी!या व्हिडिओला कॅप्शन देण्यात आले आहे की, तो एका उडीत 22 फूट अंतर कापतो आणि सुमारे 70 मैल प्रति तास वेगाने धावतो. म्हणजेच तो सुमारे 112 किलोमीटर प्रतितास वेगाने धावत आहे. विशेष बाब म्हणजे चित्ता 22 फूट उडी घेत धावत असल्याचे सांगितले जात आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, यूजर्स मंत्रमुग्ध झाले आहेत.