ताइवान शहरातील प्रसिद्ध 'नानफांगोओ ब्रिज' मंगळवारी अचानक खाली वाहत असलेल्या पाण्यात सामावला. स्थानिक रिपोर्ट्सनुसार, १ ऑक्टोबरला सकाळी पुलावरून एक ऑइल टॅंकर जात होता. जेव्हा टॅंकर पूल पार करणारच होता, तेव्हा अचानक पूल पाण्यात सामावला. त्यामुळे ऑइलच्या टॅंकरमध्ये आग लागली आणि आकाशात धुराचे लोळ दिसू लागले होते. या घटनेत पुलाखालून बोटमधून प्रवास करणारे काही लोक जखमी झाले. अजूनही सहा लोकांचा शोध सुरू आहे.
रिपोर्ट्सनुसार, हा पूल १४० मीटर लांब, १५ मीटर रूंद आणि १८ मीटर उंच होता. हा पूल १९९८ मध्ये बांधण्यात आला होता. पण अचानक या पुलाच्या पडण्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.