उन्हाळ्यात दिवसेंदिवस तापमान वाढत असून वातावरणात बदल होत आहे. सध्या लॉकडाऊन सुरू असल्यामुळे आपण आपल्या घरी सुरक्षित आहोत. गरमीपासून वाचण्यासाठी फॅन, एसी किंवा कुलरचा वापर केला जात आहे. मुक्या जनावरांना मात्र निसर्गात उपलब्ध असलेल्या वस्तूंपासूनच आपलं संरक्षण करावं लागतं. प्रत्येक ऋतूत प्राणी वेगवेगळ्या प्रकारे आपलं संरक्षण करताना दिसून येतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडीयावर व्हायरल होत आहे.
वाकया जंगलातील वाघ संपूर्ण कुटुंबासोबत तलावात पाण्याचा आनंद घेताना दिसून येत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. लॉकडाऊनमध्ये वाढत्या गरमीच्या वातावरणात आनंद घेण्यासाठी आणि अंघोळीसाठी हे वाघ पाण्यात उतरले आहेत. या व्हिडीओमध्ये मनाला शांतता वाटेल असे वेगवेगळे पक्ष्यांचे आवाज येत आहे. अशा वातावरणात प्राणी आपल्या जीवनातील आनंद उपभोगत आहेत. (हे पण वाचा-CoronaVirus News : मुक्या जनावरांना समजलं; माणसांना कधी कळणार? फोटो झाला व्हायरल)
हा व्हिडीओ ट्विटरवर आयएफएस अधिकारी प्रवीण कासवान यांनी शेअर केला आहे. हा व्हिडीयो मुकेश वर्मा यांनी काढला आहे. सोशल मीडीयावर हा व्हिडीओ धुमाकुळ घालताना दिसून येत आहे. एका ट्विटर युजरने वाघांना अंघोळ करताना पाहून निसर्गाचं संगीत सुरू असल्याची कमेंट केली आहे. याआधी सुद्धा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यात वाघ लॉकडाऊनमुळे रस्त्यावर आराम करताना दिसत होते आणि आता चक्क वाघाचा पाण्यातील व्हिडीओ पाहून नेटकरी आनंद घेत आहेत. (हे पण वाचा-मांजरीचं पिल्लू आजारी पडलं; मग काय या मनीमाऊने स्वतःच रुग्णालयात नेलं, पाहा व्हायरल फोटो)