तुम्ही अनेकदा पाहिलं असेल ट्रॅफिक पोलिस नियम मोडणाऱ्यांना पकडतात आणि चांगलाच दंड वसून करतात. कधी कधी बाईक किंवा कार चालक गाडीचे पुरेसे कागदपत्र नसतानाही खूप आत्मविश्वासानं पोलिसांशी बोलत असतात पण जेव्हा कागदपत्र दाखवण्याची वेळ येते तेव्हा पावती फाडण्याशिवाय कोणताही पर्याय नसतो. म्हणून बरेचजण ट्रॅफिक पोलिसांची नजर चुकवून निघून जाण्याचा प्रयत्न करतात. सध्या सोशल मीडियावर ट्रॅफिक पोलिसांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
आयएफएस अधिकारी दिपांशू काबरा यांनी हा फोटो शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून ट्रॅफिक पोलिस आपल्या कामात किती एक्सपर्ट्स असतात हे तुम्हाला दिसून येईल. ही सगळी कमाल त्यांच्या अनुभवाची असते. हा व्हिडीओ शेअर करताना दिपांशू काबरा यांनी कॅप्शन दिलं आहे की, 'याला अनुभव म्हणतात'. नेहमी आपले लायसेंस, महत्वाची कागदपत्र सोबत ठेवा. हेलमेट, सीटबेल्ट आणि मास्क लावायला विसरू नका आणि निश्चिंतपणे ड्रायव्हिंग करा.
या २४ सेंकंदाच्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता रस्त्याच्या मधोमध एक महिला ट्रॅफिक पोलिस हात दाखवत आहे. बाईकस्वाराला वाटतं की, त्याला थांबवण्यासाठी या महिलेनं हात दिला आहे. बाईकस्वाराला त्या महिलेनं पुढे जायला सांगितल्यानंतर खरंच थांबायचं की जायचंय असा तो पुढे उभ्या असलेल्या पोलिसाला विचारतो. माझ्याकडे सगळीकागदपत्र असल्याचेही सांगतो. Viral : ऑनड्यूटी स्तनपान करत होती महिला पोलिस; फोटो व्हायरल होताच अधिकाऱ्यांनी मागितली माफी
त्यानंतर ट्रॅफिक पोलिस कर्मचारी म्हणतात की, तुझ्याकडे सगळी कागदपत्र आहेत. म्हणूनच थांबला आहेस. कागदपत्र नसते तर कधीच पळून गेला असतो. आता जा तू.... या दोघांमधला हा संवाद ऐकून अनेकांना हसू अनावर झालं आहे. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना दिसून येत आहे. बोंबला ! वरात आली, लोक जेवले झिंगाट नाचले अन् ऐनवेळी नवरीने लग्नास दिला नकार, कारण!