२०२० मध्ये तुम्ही अनेक वेगवेगळ्या गोष्टी पाहिल्या असतील. लॉकडाऊनच्या काही दिवसात प्राण्यापक्ष्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. माणसं आपापल्या घरी बंद असल्यामुळे प्राण्यांचा मुक्त संचार सुरू होता. पण असा थरारक व्हिडीओ तुम्ही याआधी कधीही पाहिला नसेल. या व्हिडीओत एक पक्षी आणि शार्कप्रमाणे दिसणारा मासा आहे.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता. एका पक्ष्याने माश्याला पकडले आहे आणि हवेत उडायला सुरूवात केली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर युएसएचे मायर्टल बीच यांनी शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये शिकारी पक्षाने आपल्या पायांमध्ये माश्याला पकडले आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांची झोप उडाली आहे.
हे असामान्य असे दृष्य दक्षिण कैरोलिनामधील सोशल मीडिया युजर बर्बेजकडून टिपण्यात करण्यात आले आहे. बर्बेज यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत 'ईगल? कोंडोर? मायर्टल बीचमध्ये शार्कला पकडल्याचे लिहिले आहे. हा व्हिडीओ ट्विटररही शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आत्तापर्यंत १५ लाख व्हिव्हज मिळाले आहेत. यात छान शांत समुद्रकिनारा आहे. परंतू अचानक आलेल्या पक्ष्याने माश्यावर झेप घेतली आहे. काहीवेळासाठी हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही काही वेळासाठी घाबरायला होईल.
ट्विटर अकाउंटधारक 'ट्रॅकिंग शार्क्स' ने हा व्हिडीओ शेअर करताना या माश्याला ओळखण्यासाठी सोशल मीडिया युजर्सची मदत मागितली आहे. बारकाईने पाहिल्यास दिसून येईल. हा मासा पक्ष्याच्या तावडीतून बाहेर येण्यासाठी धडपड करत आहे. या व्हिडीओला ''हा कोणत्या प्रकारचा मासा आहे, शार्क तर नाही ना'' असं कॅप्शन देण्यात आलं आहे.
वाह रे पठ्ठ्या! २० वर्षीय मुलाने ३ हजार २०० किमी सायकल चालवून अखेर घर गाठलं
खरं की काय! बडवायझरचा कर्मचारी १२ वर्षे बिअर टँकमध्ये मुत्रविसर्जन करायचा? जाणून घ्या सत्य