आकाशात यूएफओ आढळण्याच्या कितीतरी घटना याआधी समोर आल्या आहेत. मात्र यावेळी संयुक्त अरब अमीरात(UAE) च्या अल ऐन शहरातून आकाशात असा काही नजारा दिसला की, बघणारे हैराण झालेत. हा अनोखा नजारा दिसणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ तुम्हीही बघा आणि हे काय असेल याचा विचार करा...
ओमानच्या सीमेजवळ असलेल्या या शहरातील आकाशात एक गोलाकार भोवरा दिसतो आहे. काही लोक म्हणाले की, हा नजारा कुणीतरी आकाशात छिद्र केल्यासारखा दिसत होता.
तर काही लोकांनी याला यूएफओ असल्याचं म्हटलं आहे. अशाप्रकारे वेगवेगळ्या प्रतिक्रिया यावर लोक देत आहेत.
खगोलशास्त्रज्ञ आणि हवामान विज्ञानाचे अभ्यासक इब्राहिम अल जारवानने ट्विटरवर या क्लिपबाबत लिहिले की, 'हा सुंदर आणि दुर्लभ नजारा आहे. अशा नजाऱ्यांना 'फॉलस्ट्रेक होल' किंवा 'होल पंच क्लाउड' म्हटले जाते.