बॉलिवूडच्या कितीतरी सिनेमांमध्ये हा सीन बघितला असेल की, हिरोईन डोंगराहून खाली पडणार असते आणि इतक्यात हिरो हेलिकॉप्टरने येऊन तिला वाचवतो. म्हणजे फुल्ल प्लॅनिंग केलं जातं तेही केवळ हिरोच्या एन्ट्रीसाठी. पण अशीच घटना रिअल लाइफमध्येही घडली आहे. पण हे कुणी हिरो-हिरोईन नव्हते. अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील ही घटना असून एक ६९ वर्षाच्या महिलेचा जीव वाचवण्यात आलाय.
ही ६९ वर्षाची महिला डोंगरावर ट्रेकिंग करण्यासाठी गेली होती. हे करत असताना ती घसरली आणि अडकून राहिली. इतक्यात रिअल लाइफ हिरोची एन्ट्री झाली. जिथे ही महिला अडकून होती आणि जेथून तिचा पाय घसरला तेथून खाली १०० फूट खोल दरी होती.
Rubio Canyon असं या ठिकाणाचं नाव असून हे एक लोकप्रिय डेस्टिनेशन आहे. लोक इथे ट्रेकिंगसाठी नेहमीच येतात. पण ही महिला अचानक ट्रेकिंग करताना खाली घसरली, पण तिने झाडांना पकडून ठेवलं. पण इतक्यात तिचा पाय घसरला आणि ती खाली फरपटत जात होती, इतक्यात हेलिकॉप्टर आलं. हेलिकॉप्टरमधील जवानाने महिला खाली पडणार इतक्यात तिला धरलं. आणि हेलिकॉप्टर त्यांना घेऊन गेलं.