आपण अनेकदा कुठे प्रवास करत असताना असे अनेक बिनधास्त लोक बघतो, जे त्यांच्यातच गुंतलेले असतात. इंटरनेटवर सध्या अशाच एका महिलेची जोरदार चर्चा रंगली आहे. सोशल मीडियात यूजर्स तर या महिलेच्या कॉन्फिडन्सचे फॅन झाले आहेत. कारण ही महिला चालत्या ट्रेनमध्ये सीटवर फोनचा कॅमेरा ऑन ठेवून बिनधास्त स्वत:चं फोटोशूट करत होती. तिचा तिचा हे फोटोशूट करतानाचा व्हिडीओ एकाने शूट केला आणि आता हा व्हिडीओ व्हायरल झालाय.
ही बातमी लिहून होईपर्यंत ८५ लाखांपेक्षा अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला. तर हजारो लोकांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. तसेच यावर अनेक कमेंट करून महिलेच्या कॉन्फिडन्सचं कौतुक केलं जातं आहे.
एका ट्विटर यूजरने हा व्हिडीओ १७ ऑगस्टला शेअर केला होता. ५७ सेकंदाच्या या व्हिडीओला ८५ लाखांपेक्षा अधिक व्ह्यू मिळाले आहेत. तर व्हिडीओ ३५ हजार २०० लोकांनी रिट्विट केलाय आणि २३१, ८६३ लाइक्स मिळाले आहेत.
या व्हिडीओत महिला प्रवाशी ट्रेनमध्ये असलेल्या कुणाचीही चिंता न करता बिनधास्त होऊ तिचं फोटोशूट करत आहेत. फोटोशूटसाठी तिने कॅमेरा सीटवर ठेवला आहे. त्यासमोर ती वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे. जेसिका जॉर्ज असं या महिलेचं नाव असून तिने यूजर्सचे आभारही मानले.