सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ हे सातत्याने व्हायरल होत असतात. नवीनवीन मजेशीर व्हिडीओ हे पाहायला मिळतात. असाच एक व्हिडीओ आता तुफान व्हायरल झाला आहे. एका प्राणिसंग्रहालयात दोन महिलांची हाणामारी झाली आहे. चीनच्या (China) बीजिंगमधील (Beijing) प्राणीसंग्रहालयात (Zoo) महिलांमध्ये जोरदार राडा झाला आहे. त्या आपापसात भिडल्या असून एकमेकींचे कपडे फाडण्यात आले आहेत. बीजिंग वाइल्डलाईफ पार्कमध्ये (Beijing Wildlife Park) ही धक्कादायक घटना घडली आहे. एका ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
7 ऑगस्टला प्राणीसंग्रहायलाच आलेल्या पर्यटकांमध्ये भांडण झालं झाली. सुरुवातीला दोन महिलांनी एकमेकींवर हल्ला केला. त्यानंतर संपूर्ण कुटुंबच एकमेकांवर तुटून पडलं. महिलांनी एकमेकींना लाथा मारल्या, केस ओढले, कपडे फाडल्याचं समोर आलं आहे. व्हिडीओ पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. याबाबत पार्क प्रशासनाने चीनच्यासोशल मीडियावर दिलेल्या माहितीनुसार, पार्कमध्ये फिरायला आलेल्या पर्यटकांमध्ये अचानक कोणत्या तरी कारणावरून जोरदार हाणामारी झाली. संपूर्ण घटना तिथल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
भांडणाऱ्या एका महिलेच्या हातात एक छोटं बाळ देखील होतं. तिने दुसऱ्या महिलेला जमिनीवर ढकलून दिलं. तसेच या हाणामारीत त्यांचे कपडे देखील फाटले गेले. यामध्ये दोन्ही कुटुंबातील जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सोशल मीडियावर हाणामारीचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून आतापर्यंत तो हजारो लोकांनी पाहला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. काही दिवसांपूर्वी बिहारमध्ये लसीकरणासाठी नागरिकांची एकच झुंबड उडाली. कोरोना लसीसाठी महिलांनी एकमेकांना धक्काबुक्की केली. तसेच रुग्णालयात जोरदार हाणामारी देखील पाहायला मिळाली होती.
कोरोना लसीसाठी महिला एकमेकींच्या जीवावर उठल्या, रुग्णालयातच भिडल्या
बिहारमध्ये कोरोना लसीसाठी (Corona Vaccination) काही महिला एकमेकींच्या जीवावर उठल्या. रुग्णालयातच त्या एकमेकींना भिडल्या असून एकमेकींचे केस ओढले आहेत. सोशल मीडयावर या घटनेचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. कोरोना लसीसाठी महिलांमध्ये तुफान हाणामारी झाली आहे. छपरा जिल्ह्यात ही धक्कादायक घटना आहे. एकमा रुग्णालयामध्ये महिला कोरोना लस घेण्यासाठी गेल्या होत्या. लसीसाठी महिलांची रांग लागली होती. या रांगेवरूनच महिलांमध्ये सुरुवातीला थोडा वाद सुरू झाला. पुढे वादाचं रूपांतर हाणामारीत झालं.