नवी दिल्ली : सोशल मीडियावर नेहमी काही ना काही भन्नाट गोष्टी व्हायरल होत असतात. काही गोष्टी नेटकऱ्यांचे मनोरंजन करतात, तर व्हायरल होणाऱ्या काही गोष्टी खरोखरच विचार करण्यास भाग पाडतात. सध्या महिलाशिक्षकांच्या हाणामारीचा एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. खरं तर विद्यार्थ्यांसमोरच महिलाशिक्षकांनी एकमेकांना धक्काबुक्की करण्यास सुरूवात केली. व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की, दोन महिला शिक्षकांमध्ये जोरदार भांडण होत आहे, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.
दरम्यान, हा व्हायरल व्हिडीओ उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यातील सरकारी मुलींच्या शाळेचा असल्याचे सांगण्यात येत आहे. जिथे दोन महिला शिक्षकांमध्ये काही गोष्टीवरून वाद सुरू झाला. काही वेळातच दोघांमध्ये बाचाबाची सुरू झाली. धक्कादायक बाब म्हणजे दोन्ही महिला शिक्षिका विद्यार्थ्यांसमोरच एकमेकांशी भांडू लागल्या. दोघींनीही एकमेकांवर प्रहार करण्यास सुरूवात करतात. यानंतर प्रकरण आणखी चिघळले आणि बघता बघता आणखी काही शिक्षकांनी देखील या भांडणात उडी घेतली.
नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली व्हिडीओ पाहून सर्वांनाच धक्का बसत आहे, तर या शिक्षिका विद्यार्थ्यांना काय मार्गदर्शन करत आहे अशी विचारणा केली जात आहे. शिक्षक ज्या पद्धतीने आपापसात भांडत आहेत, ते खरोखरच धक्कादायक दृश्य आहे. आता हे प्रकरण सोशल मीडियावर गाजत आहे. सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर लोक हा व्हिडीओ शेअर करत आहेत. प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत स्थानिक शिक्षणाधिकाऱ्यांनी तीन शिक्षकांना निलंबित केले आहे. तर नेटकरी या घटनेची खिल्ली उडवत आहेत.