शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

Emotional Video: पित्याची शेवटची इच्छा मुलीने केली पूर्ण; मरणासन्न अवस्थेत इंजेक्शनमधून पाजली दारू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2022 8:04 PM

वडीलांनी इशाऱ्याने मुलीला सांगितली शेवटची इच्छा

Daughter Father Relationship Emotional Video: वडील आणि मुलगी यांचं नातं काही वेगळंच असतं. वडील आपली मुलगी मोठी होईपर्यंत सर्वतोपरि तिचं संरक्षण करतात. आपल्या मुलीची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी वडील झटत असतात. नंतर जेव्हा मुली मोठ्या होतात, तेव्हा त्यादेखील वडिलांचा नीटपणे सांभाळ करतात. असाच एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत असून सोशल मीडिया यूजर्स याची चर्चा करत आहेत. या व्हिडिओमागची कहाणी थोडीशी मजेदार असली तरी प्रचंड भावूक करणारी आहे. हे प्रकरण ऑस्ट्रेलियातील असल्याचे सांगण्यात येत आहे आणि हा व्हिडिओ टिकटॉकवर शेअर करण्यात आला होता.

'न्यूयॉर्क पोस्ट'च्या वृत्तानुसार, एका मुलीचे वडील गंभीर आजारी होते आणि रुग्णालयात ते शेवटच्या घटका मोजत होते. वडिलांना रम (दारू) पिण्याची आवड होती. त्यामुळे वडीलांना रम पिण्याचा हट्ट धरला. म्हणूनच मुलीने वडिलांना अक्षरश: रमचे इंजेक्शन देऊन वडिलांची इच्छा पूर्ण केली. पेनलोप नावाच्या मुलीने हे कृत्य केले. तिने तिच्या वडीलांना त्यांची आवडती बुंडाबर्ग नावाची रम इंजेक्शनच्या मार्फत पाजली. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, वडील हॉस्पिटलच्या बेडवर मरणासन्न अवस्थेत आहेत आणि मुलगी त्यांच्या बाजूला शांतपणे उभी आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, मरण्यापूर्वी मुलीने वडिलांना त्यांची शेवटी इच्छा म्हणून आवडत्या पेयाचा घोट इंजेक्शनमधून दिला.

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आणि कथा जाणून घेतल्यानंतर सोशल मीडियावरील प्रत्येक जण खूप भावूक झाल्याचे दिसले. वडीलांनी हातवारे करून सांगण्याचा प्रयत्न केला की त्यांना रम खूप आवडते. त्यानंतर मुलीने अखेर इंजेक्शन मधून त्यांना रम पाजली. त्यानंतर काही तासांनी वडीलांनी अखेरचा श्वास घेतला. वडील आणि मुलीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओने अनेकांची मने जिंकली आहेत.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरलAustraliaआॅस्ट्रेलिया