सध्याच्या इंटरनेटच्या युगामध्ये गोष्टी व्हायरल होण्यासाठी अजिबात वेळ लागत नाही. काही सेकंदांमध्येच फोटो किंवा व्हिडीओ व्हायरल होतात. पण अनेकदा अशा काही गोष्टी पाहायला मिळतात, जे पाहून आपलं डोकं अगदी चक्रावून जातं. अनेकदा इंटरनेटवर दृष्टि भ्रम करणारे म्हणजेच, Optical Illusion असणारे फोटो व्हायरल होत असतात. काही लोकांना अशा फोटोंचा फार राग येतो, तर काही लोक अशा फोटोंमध्ये दडलेलं गुपित सोडवण्यासाठी अगदी वाट्टेल ते करायला तयार होत असतात.
काही दिवसांपासून इंटरनेटवर एक फोटो व्हायरल होत असून नक्की तो कसला फोटो आहे यावरून चर्चांना उधाण आलं आहे. या फोटोची उकल करताना नेटकरी अगदी नेटाकुटीला आले आहेत. व्हायरल होणारा हा फोटो काही लोकांना एका गाडीच्या तुटलेल्या दरवाज्याप्रमाणे दिसत आहे, तर काही लोकांना समुद्र किनाऱ्याच्या एखाद्या पेंटिगप्रमाणे दिसत आहे.
Optical Illusion असणारा हा फोटो ट्वीट करत एका इंटरनेट यूजरने लिहिलं आहे की, 'जर तुम्हाला Beach, समुद्र, आकाश, डोंगर आणि तारे दिसून आले तर तुम्ही खरचं एक कलाकार आहात. परंतु ही कोणतीही पेन्टिंग नाही तर एका गाडीचा तुटलेला दरवाजा आहे, जो रिपेअर करण्याची गरज आहे.'
दरम्यान; ट्विटर यूजर्सना फोटो पाहिल्यानंतर अजिबातच विश्वास बसत नाही आहे की, हा गाडीचा तुटलेला दरवाजा आहे.
खरचं... Optical Illusion असणारा व्हायरल होणारा हा फोटो पहिल्या नजरेमध्ये सुंदर समुद्राच्या किनाऱ्याचा फोटो वाटत आहे. परंतु लक्ष देऊन पाहिल्यानंतर सहज समजतं की, हा खरचं गाडीचा तुटलेला दरवाजाच आहे.
या सर्व ट्विट्सनंतर यूजरने या फोटोमागील ट्रिक ट्विट करून सांगितली आहे.