Trending Photo: सोशल मीडियावर दररोज विविध प्रकारचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही फोटो पाहून अनेकांना धक्काही बसतो. असाच एक फोटो सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. या फोटोत हॉस्टेलच्या रुममधील पंख्याखाली एक मोठी जाळी बसवलेली दिसत आहे.
कोटा येथील हॉस्टेलचा फोटो
वसतिगृहाच्या खोल्यांच्या छतावर तुम्ही अनेकदा पंखे पाहिले असतील. पण व्हायरल फोटोमध्ये दिसत असलेल्या या पंखांखाली मोठी लोखंडी जाळी बसवण्यात आली आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, 'कोटा येथील विद्यार्थी वसतिगृहात. कारण सांगा?' हे वसतिगृह कोटा येथील असल्याचा दावा केला जात आहे. देशभरातील अनेक विद्यार्थी कोटा येथे कोचिंगसाठी जातात. या फोटोला हजारो लोकांनी लाईक आणि रिट्विट केले आहे. कमेंट सेक्शनमध्ये लोक वेगवेगळे अंदाज बांधत आहेत.
कारण ऐकून बसेल धक्काविद्यार्थ्यांना आत्महत्येपासून वाचवण्यासाठी पंख्याखाली लोखंडी जाळी बसवण्यात आल्याचे बहुतांशी लोकांचे म्हणणे आहे. कोटामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांवर खूप दबाव असतो, त्यामुळे अनेक विद्यार्थी आत्महत्येसारखे पाऊल उचलतात. आत्महत्या करण्यासाठी अनेक जण पंख्यांचा वापर करतात. त्यामुळेच पंख्याखाली जाळी लावण्यात आली आहे.