कोरोना माहामारीच्या स्थितीत खूप गंभीर आणि भयंकर प्रसंगाना लोकांना तोंड द्यावं लागत आहे. ऑक्सिजनची कमतरता, बेड्स उपलब्ध नसणं, औषधांची टंचाई, माणसं दुरावणं यामुळे सगळ्याच स्तरातील लोकांवर प्रचंड ताण येत आहे. जीवघेण्या कोरोनाच्या भीतीनं कोणीही एकमेकांना मदत करण्यासाठी पुढे येत नाहीये. अशीच एक धक्कादायक घटना समोर येत आहे.
व्हायरल झालेल्या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता एक महिला बेशुद्धावस्थेत पडली आहे. कोरोनाच्या भीतीनं या महिलेला कोणीही रुग्णालयाात घेऊन जायला तयार नाही. नाईलाजानं या महिलेला जीसीबीमध्ये बसवून रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, तोपर्यंत या महिलेला मृत घोषित करण्यात आलं होतं.
नशीब चमकलं ना राव! पहिल्यांदाच तिकीट विकत घेतलं; १०० रूपयांच्या लॉटरीनं मजूराला करोडपती बनवलं
टाईम्स ऑफ इंडियानं दिलेल्या माहितीनुसार जेव्हा ही महिला बेशुद्ध झाली. तेव्हा लोक आपल्या वाहनांचा वापर करण्यााठी घाबरत होते. कोणाीही रुग्णालयात फोन करून रुग्णवाहिका बोलावण्याचेही कष्ट घेतले नाही. अखेर जेसीबी मशिनने या महिलेला रुग्णालयात नेण्यात आलं.
नुकत्याच बऱ्या झालेल्या आजींनी डॉक्टरांना मारली मीठी; समोर आला मन हेलावून टाकणारा फोटो
या महिलचें वय ४२ वर्ष आणि तीचे नाव चंद्रकला होते. आपल्या लहान मुलीसह ती वास्तव्यास होती. मिळेल ते लहान मोठे काम करून आपला उदरनिर्वाह चालवत होती. या महिलेची रात्रीच्या सुमारात अचानक तब्येत बिघडल्यानं या दुर्दैवी प्रसंग ओढावला.
या महिलेची लहान मुलगी रडत होती. तरी कोणीही मदतीला धावून आले नाही. रिपोर्टनुसार ६ वर्षांपूर्वी या महिलेच्या पतीचं निधन झालं होतं. त्यामुळे १० वर्षांचा मुलगा आणि १२ वर्षीय मुलीची संपूर्ण जबाबदारी या महिलेवरच होती.