'महिंद्रा अँड महिंद्रा'चे चेअरमन आनंद महिंद्रा सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असतात, त्यांना मिळणाऱ्या वेगळ्या गोष्टी ते ट्विट करत असतात. आता आणखी एक व्हिडीओ त्यांनी ट्विट केला आहे . या व्हिडीओत एक वेगळी गाडी दिसत आहे. ही गाडी चालत्या फिरत्या डायनींग टेबलची दिसत आहे.
हा व्हिडीओ उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी 3 जुलै रोजी शेअर केला. त्यांनी या व्हिडीओला कॅप्शनही दिली आहे. 'ही ई-मोबिलिटी आहे, ज्यामध्ये E चा अर्थ Eat आहे, अशी कॅप्शन महिंद्रा यांनी दिली आहे.
Thane: 'व्हॅलेंटाईन डे'च्या दिवशी छेड काढणाऱ्याला मुलींनी झाडूने दिला चोप; ठाण्यातील Video Viral
या व्हिडिओला हजारो लाईक्स आणि 13 लाख व्ह्यूज मिळाले आहेत. या पोस्टला नेकऱ्यांनी कमेंटही केल्या आहेत. नेटकऱ्यांना हा देसी जुगाड खूप आवडला आहे, तर काहींनी याला धोकादायक म्हटले आहे.
हा व्हिडीओ 24 सेकंदाचा आहे, पेट्रोल पंपावर डायनिंग टेबल चालत येत आहे. त्यावर चार जण बसलेली दिसत आहेत. टेबलवर प्लेट्स, वाईन ग्लास अशा वस्तू ठेवल्या आहेत. तसेच, टेबलावर एक हँडल आहे ज्याच्या मदतीने व्यक्ती हे वाहन नियंत्रित करत आहे. मोबाईल टेबल पेट्रोल पंपावर थांबल्यावर पंप कर्मचारी त्यात पेट्रोल टाकतो. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.