सध्या फिफा वर्ल्डकप सुरु आहे. मेस्सीचा अर्जेंटीना अंतिम सामन्यात पोहचला आहे. सोशल मीडियावर फिफाचे अनेक व्हिडिओ फोटो व्हायरल होत आहेत, फ्रान्स आणि अर्जेंटिना रविवारी अंतिम फेरीत भिडणार आहेत. या सामन्यापूर्वी स्टेट बँक ऑफ इंडियाचे पासबुक ट्रेंड होत आहे. तुम्हाला वाटले आता यात एसबीआयचा काय संबंध. अर्जेंटिनाच्या जर्सीचा कलर SBI च्या पासबुकसारखा आहे.
लिओनेल मेस्सीच्या संघाने क्रोएशियाला हरवून अंतिम फेरीत प्रवेश करताच सोशल मीडियावर पासबुकचा फोटो व्हायरल झाला आहे. मेस्सीचे भारतात लाखो चाहते आहेत .
मुलीने व्हॉट्स अॅप फॅमिली ग्रुपवर मेसेज पाठवला, घरचे मेसेज वाचून झाले थक्क
नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर एसबीआय पासबुकचे अनेक फोटो शेअर केली आहेत आणि त्यांना अर्जेंटिना आणि फ्रान्स सामन्याशी जोडले आहे. अर्जेंटिना तिसऱ्यांदा जेतेपदावर नाव कोरेल, असा चर्चा यावर सुरू आहेत.
35 वर्षीय मेस्सी हा पेले, मॅराडोना यांच्यासारख्या महान खेळाडूंपैकी एक मानला जातो आणि पोर्तुगालच्या ख्रिस्तियानो रोनाल्डोसारख्या खेळाला अभिमान वाटावा अशा खेळाडूंपैकी एक मानला जातो. मेस्सीच्या संघाला 2014 च्या फायनलमध्ये जर्मनीकडून पराभवाला सामोरे जावे लागले होते. यापूर्वी अर्जेंटिनाने 1978 आणि 1986 मध्ये विश्वचषक ट्रॉफी जिंकली होती.
अर्जेंटिनाला तिसऱ्यांदा विजेतेपद मिळवून द्यावे, अशी प्रार्थना चाहते करत आहेत. अर्जेंटिनाचा कट्टर प्रतिस्पर्धी ब्राझील संघही मेस्सीच्या संघाला सपोर्ट करत आहे. त्याआधी फ्रान्सने उपांत्य फेरीत मोरोक्कोचा पराभव केला होता.