सोशल मीडियावर दिल्लीतील एका वृद्ध दामप्त्याचा व्हिडीओ गेल्या दोन दिवसांपासून व्हायरल होत होता. दक्षिण दिल्लीतील मालवीय नगरमध्ये 'बाबा का ढाबा' नावाने जेवणाचे पदार्थ बनवून एक छोटसं दुकान चालवतात. या आजोबांचे नाव कांताप्रसाद आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हे वृद्ध दांमप्त आपला उदरनिर्वाह करण्यासाठी अन्नपदार्थ विकून पैसे मिळवत होते. पण लॉकडाऊन झालं आणि त्यांची कमाई पूर्ण बंद झाली. अशातच एक यूट्यूबर त्यांचा व्हिडिओ रेकॉर्ड करत असताना या आजोबांना रडू कोसळले आणि बघता बघता व्हिडीओ व्हायरल झाला.
नेटिझन्सनी या व्हिडीओला पसंती दिल्यानंतर लगेचच या ढाब्यावर लोकांनी गर्दी करायला सुरूवात केली त्यानंतर या बाबांच्या ढाब्याचा कायापालट झाला. झोमॅटो'ने ट्विट करत, 'बाबा का ढाबा' आता झोमॅटोवर लिस्टेड असून आमची टीम त्यांच्यासोबत काम करत असल्याची, माहिती दिली होती. आता आयएएस अधिकारी अवनिश शरण यांनी या आजोबांच्या ढाब्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. क्या बात! शाळेच्या आठवणींना उजाळा देत रतन टाटांनी शेअर केला 'जुना' फोटो, फॅन्स म्हणाले.....
आयएएस अधिकारी अवनिश शरण यांनी हा फोटो शेअर करत असताना कॅप्शन दिलं आहे की, बाबा का ढाबा, सर्वकाही छान दिसत आहे. पण बाब मात्र दिसत नाहीत. लोकांना या ढाब्याच्या बाहेर आपल्या जाहिराती लावायलाही सुरूवात केली आहे. त्या ढाब्याजवळ अनेकांनी नवीन दुकान उघडलं आहे. सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून या बाबांच्या फोटोंनी धुमाकूळ घातला आहे. कडक सॅल्यूट! फक्त ४ तासात ६८ वर्षांच्या आजींनी चिमुरड्या नातवासह सर केला हरिहर गड