ट्राफिक नियमावरुन आता अनेकांना ऑनलाईन चलन मिळतात. आपण ट्राफिकचे नियम मोडले तर आपल्याला आता ऑनलाईन दंड भरावा लागतो. यासाठी शहरात विविध ठिकाणी सीसीटीव्ही लावलेले असतात. सध्या पुण्यातील एक ऑनलाईन चलन चर्चेत आहे, ७ डिसेंबर रोजी काढलेले हे चलन आहे. या चलनाचा फोटो शेअर करत एका वाहनधारकाने ट्विट करत पुणेपोलिसांचे फोटोसाठी आभार मानले आहेत. ही पोस्ट ट्विट करत पुणेपोलिसांना टॅग केली आहे, पोलिसांनीही या ट्विटला भन्नाट रिप्लाय दिला आहे.
हे ७ डिसेंबरचे आहे. मेलविन चेरियन नावाच्या एका व्यक्तीने ट्विटरवर स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. यात 'पुणे शहर पोलिसांचे' आभार - मी छान दिसत आहे मी चलन भरेन, असं कॅप्शन दिले आहे. त्याच्या या ट्विटला आतापर्यंत 300 हून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.एका नेटकऱ्याने कमेंटमध्ये, बाईक चालवताना हेल्मेट घातले तरी लोक चांगले दिसतात, असं लिहिले आहे. अनेकांनी त्याला हेल्मेट घालण्याचा सल्ला दिला आहे. विशेष म्हणजे त्या ट्विटला 'पुणे शहर पोलिसांनी' एक भन्नाट सल्ला दिला आहे.'कोणत्या कलरचे हेल्मेट सूट होईल हे यात सांगितले आहे.
नारळ फोडण्याची ही भन्नाट आयडिया पाहिली का? पाहा व्हायरल व्हिडिओ, नारळ फोडण्याचं टेंशन नाही..
'पुणे शहर पोलीस' (@PuneCityPolice) ने त्या व्यक्तीच्या ट्विटला उत्तर दिले आहे. 'या काळ्या कलरच्या जॅकेटसोबत काळ्या कलरचे हेल्मेट छान दिसेल, असं भन्नाट उत्तर दिल आहे. त्या तरुणाने हेल्मेटशिवाय दुचाकी चालवत असतानाचे फोटो आहे. पोलिसांनी हा फोटो चालनाद्वारे पाठवला आहे, यानंतर तरुणाने अनोख्या शैलीत त्याचे उत्तार दिले आहे. हे ट्विट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे.