बीजिंग : तरुणाई बेराेजगारीवर मात करण्यासाठी नवनविन युक्ती शोधून काढत आहे. चीनमध्ये सध्या तरुण मुले नोकऱ्या सोडून घरी बसणे पसंत करीत आहेत. त्यांना पालकही रितसर वेतन देत आहेत. ‘फुल-टाइम चिड्रन’ हा ट्रेंड तेथे व्हायरल झाला आहे.
चीनच्या लुओआंग शहरातील २१ वर्षीय ली ही सध्या घरी थांबून तिच्या आजीची काळजी घेत आहे. याचा तिला चांगला मोबदला मिळताे. अशी अनेक मुले चीनमध्ये आहेत. ‘फुल-टाइम सन्स अँड डॉटर्स’अशी नवी संकल्पना निर्माण केली गेली आहे. (वृत्तसंस्था)
बेरोजगारी शिखरावर
हा कल व्हायरल होण्यामागे वाढती बेरोजगारी हे एकमेव कारण आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे. चीनमधील १६ ते २४ या वयोगटातील तरुणांतील बेरोजगारीचा दर गेल्या महिन्यात २१.३ टक्के झाला. कोविडच्या साथीमुळे विस्कटलेली घडी चीनला अजूनही सावरता आलेली नाही. त्यामुळे बेरोजगारी वाढली आहे.