सोशल मीडियावर काही ना काही अनोख्या गोष्टी मिळत राहतात. १९८५ सालचे रेस्टॉरंटचे बिल ज्यात २६ रुपयात शाही पनीर, दाल मखनी आहे, हे bill बिल व्हायरल झाले. आता एका सायकलचे बिल व्हायरल झाले आहे. हे बिल ७ जानेवारी १९३४ सालचे आहे. यामध्ये एक सायकल केवळ १८ रुपयांची आहे. आता सध्याच्या युगात १८ रुपयात सायकल मिळेल अशी कल्पनाही करता येणार नाही. साधे पंक्चर सुद्धा १८ रुपयात निघत नाही. हे बिल पाहून अनेकांना तारक मेहता का उल्टा चष्मा मधील भिडे मास्तरचा काळ आठवला असेल.
संजय खरे यांच्या फेसबुकवर त्यांनी हे बिल शेअर केले आहे. त्यांनी लिहिले, सायकल माझ्या आजोबांचे स्वप्न होते. सायकल च्या चाकासारखे काळाचे चाकही किती लवकर पुढे सरकत आहे. ८८ वर्ष जुने हे एका सायकलच्या दुकानातील बिल आहे. यावर दुकानाचे नाव कुमुद सायकल स्टोर्स असे लिहिले आहे. याचा पत्ता कोलकत्ता चा आहे. यावर सायकल ची किंमत केवळ १८ रुपये आहे. हे बिल सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
विद्यार्थ्याचा कारनामा! परीक्षेत लिहिलं I LOVE MY POOJA; शिक्षकाला दिल्या 100-100 च्या नोटा
हे बिल पाहून अनेक जण जुन्या काळात हरवले असतील. एवढ्या स्वस्त दरात तेव्हा गोष्टी मिळत होत्या ज्याचा आज विचारही करु शकत नाही. मात्र तेव्हा कमाईही कमीच होती. मात्र सध्या हे बिल पाहून जुन्या काळात फेरफटका मारुन आल्यासाखे तु्म्हालाही वाटेल.