मुलगा एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेला. मागून एका एका दरोडे खोऱ्याने पैसे लटण्याचा प्रयत्न केला. दरोडेखोर दुसरा तिसरा कोण नसून त्या मुलाचे वडिल होते. वडिलांना पाहून मुलाला धक्काच बसला. ही घटना सध्या सोशल मीडियावर व्हारल झाली आहे. स्कॉटलंडमधील ग्लासगो येथील प्रकरण आहे. जिथे एका व्यक्तीने चुकून आपल्याच मुलाला लुटण्याचा प्रयत्न केला. ही घटना गेल्या वर्षी १९ नोव्हेंबर रोजी घडली होती. ग्लासगो येथील क्रॅनहिल येथे एका ४५ वर्षीय व्यक्तीने एटीएममधून पैसे काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या तरुणाला लक्ष्य केले, पण तो आपलाच मुलगा असल्याचे समजल्यावर मुखवटा घातलेल्या व्यक्तीला लाज वाटली.
१७ वर्षीय तरुण घराजवळील एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेला होता. त्याने त्याचे कार्ड मशीनमध्ये स्वाइप केले आणि एटीएमने १० डॉलर काढले. दरम्यान, एका मुखवटा घातलेल्या व्यक्तीने त्याच्यावर हल्ला केला आणि त्याचा गळा पकडून भिंतीला दाबला. त्यानंतर चाकू दाखवून त्याच्याकडे पैसे मागितले. दरम्यान, हा आवाज ओळखीचा असल्याचे तरुणाला वाटले. त्याला समजले की ते त्याचे वडील आहेत. आधी तो स्तब्ध झाला, मग म्हणाला- वेडा झाला आहेस का? तुला माहीत आहे का मी कोण आहे? दरोडेखोराने उत्तर दिले की त्याला पर्वा नाही, तर मुलगा म्हणाला - तू काय करतोस? तेव्हा त्या व्यक्तीला आपली चूक समजली आणि तो आपल्या मुलाला म्हणाला - मी हतबल आहे, मला क्षमा कर.
यानंतर मुलाने पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्याने घरातील इतर सदस्यांनाही सर्व काही सांगितले. पोलिसांनी मुलाच्या वडिलांना अटक केली, त्यानंतर त्या व्यक्तीनेही आपला गुन्हा कबूल केला. तो आपला मुलगा आहे हे त्याला माहीत नसल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. याप्रकरणी कारवाई करताना आरोपी वडिलांना २६ महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.