सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही, गेल्या काही दिवसापूर्वी एका विद्यार्थ्याचा रजेचा अर्ज व्हायरल झाला होता. आता असाच एक तक्रार अर्ज व्हायरल झाला आहे. यात एका विद्यार्थ्यांने वर्गातील मुलींच्या विरोधात तक्रारीचा अर्ज मुख्याधपकांना दिला आहे. वर्गात मुला-मुलींचे गट एकमेकांशी भिडलेले आपण पाहिले असतील.
सध्या वर्गातील मुलांनी मुलींना लिहिलेले तक्रार पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इयत्ता सातवीचे विद्यार्थी इतके नाराज झाले की त्यांनी वर्गातील मुलींना तक्रार करणारे पत्र लिहिले. मुली मुलांना विचित्र नावाने हाक मारतात, असं या तक्रारीत म्हटले आहे.
वर्गातील मुलींनी आता मुलांची माफी मागावी, असं मुलांनी यात म्हटले आहे. तक्रार पत्र पाहता हे प्रकरण उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्याशी संबंधित असल्याचे समजते आणि त्यावर मुलांनी 'इयत्ता सातवी (ए) च्या मुलींना मुलांची माफी मागावी लागेल' असे लिहिले आहे. औरैया जिल्ह्यातील तय्यापूर येथील जवाहर नवोदय विद्यालयात विद्यार्थ्यांनी वर्गातील विद्यार्थिनींसाठी हे पत्र लिहिले आहे.
वर्गातील विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या मुख्याध्यापकांच्या तक्रार पत्रात, 'सर, आम्ही नम्र विनंती करतो की आम्ही इयत्ता सातवी (अ) चे विद्यार्थी आहोत. मुली आम्हाला लल्ला, पागल अशा शब्दाने चिडवतात.आणि मुलींची नाव खराब करतात. मुली वर्गात आवाज काढतात आणि गाणी गातात आणि संवाद साधतात, त्यामुळे आम्हाला त्रास होतो, असं या पत्रात म्हटले आहे.