कासव सगळ्यात जास्तकाळ जगू शकतो हे तुम्ही ऐकून असाल. कासवाची आवड अनेकांना असते. घरात कासव पाळण्याची वेडही अनेक तरूणांमध्ये दिसून येतं. सोशल मीडियावर काही दिवासांपूर्वी एका कासवाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये समुद्रात असलेलं प्लास्टीकची रिंग कासवाच्या गळ्यात अडकल्यामुळे कासवाला अडचणींचा सामना करावा लागला होता. आता तामिळनाडूमधील रामेश्वरच्या समुद्र किनारी एक प्रचंड मोठा कासव आढळून आला आहे. रामनाथपूरम जिल्ह्यातील मंडपम येथे १०० किलोंचा कासव सापडला आहे.
समुद्रकिनारी हा कासव सापडला होता. अनेकदा प्रयत्न करूनही कासव समुद्रात परत जाऊ शकत नव्हता. त्यानंतर रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचली आणि कासवाला पुन्हा समुद्रात पाठवण्यसाठी प्रयत्न करण्यात आले. विशेषकरून ज्या कासवांचे वजन १०० पेक्षा जास्त किंवा १०० किलोपर्यंत असते अशा कासवांना परत समुद्रात पाठवण्यासाठी प्रयत्न केले जातात. वजन पाहून या कासवांच्या वयाचा अंदाज लावला जाऊ शकतो. वृत्तसंस्था एएनआयने ट्विट करत या घटनेबाबत माहिती दिली आहे.
१ नंबर! रडणाऱ्या आजोबांच्या 'बाबा का ढाबा'ची होणार होम डिलिव्हरी, आता Zomato वर लिस्टेट
आयएफएस अधिकारी प्रविण कासवान यांनी याआधीही कासवाचा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला होता. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला कल्पना येईल की, आपली एक लहानशी चूक प्रांण्याच्या जीवावर बेतू शकते. या व्हिडीओत एक महिला हळूवारपणे कटरच्या साहाय्याने कासवाच्या गळ्यात अकडलेली प्लास्टिकची रिंग बाहेर काढत होते. हा व्हिडीओ कुठला आहे याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. महिलेच्या प्रयत्नांनी या कासवाचे प्राण वाचवण्यात यश मिळाले होते. अन्यथा या छोट्याश्या जीवाला प्राण गमवावे लागले असते. या व्हिडीओवर वेगवेगळ्या कमेंट्स आल्या होत्या. सलाम! रोज हजारो लोकांना फक्त १ रुपयात पोटभर जेवण पुरवतोय हा 'देवमाणूस'...