कर्नाटकातील दक्षिणी कन्नड जिल्ह्यातून एक विचित्र घटना समोर आली आहे. एका गावात कुत्रा आणि बिबट्या जवळपास सात तासांपर्यंत बंद होते. सात तास या दोघांचेही बचावकार्य सुरू होते. त्यानंतर या दोघांना बाहेर काढण्यात बचाव कार्याच्या पथकाला यश आलं आहे. ही घटना दक्षिण कन्नडमधील एका गावातील आहे. या ठिकाणी सकाळी सकाळी एका बिबट्यानं शिकारीसाठी कुत्र्याचा पाठलाग करायला सुरूवात केली.
पाठलाग करता करता कुत्र्याच्या मागोमाग बिबट्या एका शौचायलात शिरला. जेव्हा या दोघांचा आवाज बाहेर येऊ लागला तेव्हा आजूबाजूचे लोक आश्चर्यचकीत झाले होते. शौचालयाला बाहेरून बंद करून त्यांनी लगेचच पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांना सुचना देण्यात आल्या.
वन विभागाच्या एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार एका शौचालयात कुत्रा आणि बिबट्याला पाहून लोक चकीत झाले. कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आणि दोघांना बाहेर काढण्यासाठी (रेस्क्यू ऑपरेशन) बचावकार्य सुरू केलं. शौचालयाच्या बाहेर बचावकार्य सुरू करून बराच वेळ झाला होता. शौचालयाच्या बाहेर एक पिंजरा ठेवण्यात आला होता. त्यानंतर पशू वैद्यकिय अधिकाऱ्यांनाही बोलावण्यात आलं. सगळ्यांसाठी लोकल सुरू होताच या प्रवाशाच्या फोटोनं जिकलं आनंद महिंद्रांचं मन; म्हणाले.....
या प्रकारानंतर कुत्र्याला बिबट्यानं कोणत्याही प्रकारची ईजा पोहोचवली नव्हती. कुत्रा आणि बिबट्या दोघांनाही सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं आहे. या घटनेचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. शौचालयाच्यावर असलेल्या मोकळ्या जागेवरून हा फोटो क्लिक करण्यात आला आहे. खाकीला सलाम! महिला पोलिसानं दिला बेवासराला मृतदेहाला खांदा अन् २ किमी केली पायपीट